shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉक्टर्स डे च्या निमित्ताने डॉक्टर्स असोसिएशन ऑफ भाळवणीच्या वतीने वृक्षारोपण संपन्न


प्रतिनिधी : संजय वायकर

भाळवणी : २ / डॉक्टर्स डे (१ जुलै ) च्या निमित्ताने डॉक्टर्स असोसिएशन ऑफ भाळवणी झोन यांच्या वतीने रविवार दि . २ जुलै रोजी भाळवणी येथील शृंग ऋषींच्या वास्तव्याने पावन अशा शृंग टेकडी परिसरातील एक पर्यटनाचे आकर्षण बिंदू असलेल्या  निसर्गरम्य ठिकाणी
वृक्षारोपण करून डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला.

डॉक्टर्स डे च्या निमित्ताने
काही मान्यवरांनी उपस्थितांना पर्यावरण विषयी मार्गदर्शन केले  व निसर्ग वाचवण्यासाठी वेळोवेळी वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले .

यावेळी नागरिकांनी डॉक्टर्स असोसिएशन ऑफ भाळवणीच्या सर्व मान्यवरांना व सभासदांना शुभेच्छा दिल्या . यावेळी सर्व मान्यवर व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .
close