shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

करमाळा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची कार्यकारीणी जाहीर-अध्यक्षपदी दिनेश मडके यांची निवड



प्रतिनिधी: सुर्यकांत होनप 

करमाळा: दि. २/ डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब, सोलापुर जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटना शाखा करमाळा कार्यकारीणी जाहीर झाली. करमाळा तालुका अध्यक्षपदी दिनेश उद्धवराव मडके यांनी निवड झाली.

 करमाळा तालुका उपाध्यक्षपदी  शितलकुमार मोटे व गौरव मोरे, सचिवपदी नरेंद्रसिंह ठाकुर,  सहसचिवपदी राजाराम माने,   खजिनदार अ़ॅड. सचिन हिरडे,   संघटक ज्ञानदेव काकडे, संपर्कप्रमुखपदी अशोक मुरूमकर, व्यवस्थापक सुर्यकांत होनप प्रसिद्धी प्रमुखपदी अंगद भांडवलकर यांची निवड केली असुन तालुका  कार्यकारणी सदस्य म्हणून राहुल रामदासी  सिद्धार्थ वाघमारे, हर्षवर्धन गाडे, सागर गायकवाड यांची तर ज्येष्ठ सल्लागार सदस्यपदी महेश चिवटे, ॲड बाबुराव हिरडे,  नासिर कबीर, आशपाक सय्यद,  अशोक नरसाळे, डि. जी. पाखरे यांची निवड करण्यात आली आहे.

डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनमान्यता दिली असुन केंद्र राज्य शासनामार्फत त्याची प्रकिया सुरू आहे. डिजिटल मीडिया पत्रकार संपादक महाराष्ट्राचे  संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब यांच्या संकल्पनेतुन  भगिरथ अथक प्रयत्नांमधून डिजिटल मिडिया पत्रकारितेला अधिमान्यता मिळाली असून राजा माने साहेबांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या  पत्रकारांना  शासकीय सोयी सवलतींचा लाभ मिळवून देणे पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव कटीबध्द  राहुन काम करणार आहे. याबरोबरच  प्रिंट मिडियाप्रमाणेच डिजीटल मिडियाला शासनाच्या जाहिराती व अधिस्विकृती मिळवुन देण्यासाठी  प्रयत्नशिल राहणार आहे. पत्रकार सुरक्षा विमा योजना पत्रकार  कुटुंब कल्याण योजना पेन्शन योजना  पत्रकारांना शासन दरबारी नोंद होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी डिजिटल मीडिया पत्रकार संघ कार्यरत राहणार असल्याचे डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे करमाळ तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके यांनी सांगितले.
close