प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज शहरालगत असलेला गंगा माऊली शुगर कारखान्याचे मिल रोलर पूजन आदित्य दादा पाटील, व्हाईस चेअरमन हनुमंत मोरे,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे, गंगा माऊली शुगरचे संचालक प्रवीण मोरे, अविनाश मोरे, पशुपतीनाथ दांगट, कुलकर्णी, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी आय मुजावर, मुख्य शेतकी अधिकारी अविनाश आदनाक, चिप केमिस्ट श्री सरवदे, आदींच्या हस्ते रोलर पूजन झाले.
येणाऱ्या हंगाम गाळपासाठी पूजन कार्यक्रम घेऊन सुरुवात करण्यात आली. पुढील हंगामात साखर कारखाना सात लाख मेट्रिक टन गाळप चा टप्पा पूर्ण करेल असे मत आदित्य पाटील यांनी बोलतांना व्यक्त केले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विश्वास आणि हमीभाव याबाबाबत आम्ही शब्दबद्ध आहोत.कॅपिसिटी वाढवण्यासाठी गतीने प्रयत्न सुरू आहेत असे मत हनुमंत काका मोरे यांनी व्यक्त केले. रोलर पूजन कार्यक्रमास परिसरातील नागरिक, कारखान्याचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

