shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवीन पिढीला घडविण्यासाठी सेवाभावी वृत्तीने ग्रंथालये चालवावीत : विजय कोलते..!

 

प्रवीण मसालेवाले ट्रस्टच्या वतीने पुणे जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालयांना ग्रंथसंच प्रदान..!

पुणे : "नवीन पिढीला घडविण्यासाठी त्यांना काही द्यायचे असेल तर त्यासाठी सेवाभावी वृत्तीने ग्रंथालये चालवली पाहिजेत. ग्रंथालय चळवळ अत्यंत गरजेची असून त्यासाठी समाजाचा सहभाग वाढवून ग्रंथालये चालवावीत." असे प्रतिपादन पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजय कोलते यांनी केले. पुणे येथील शिक्षक भवनच्या सभागृहात पुणे जिल्हा ग्रंथालय संघ, पिंपरी-चिंचवड, हवेली व मुळशी तालुका ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन महिना व डिजिटल वाचन दिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध प्रविण मसालेवाले ट्रस्ट यांच्या उद्योग समुहाचे संस्थापक स्व. हूकमीचंद (भाऊ) चोरडिया यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ ट्रस्टच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालयांना ग्रंथसंच प्रदान करण्यात आले. या सोहळ्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ग्रंथालयांसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

"वाचनासाठी प्रेरणा देण्याचे काम ग्रंथालये करतात. त्यामुळे केवळ वाचन प्रेरणा दिन साजरा न करता रोज वाचन केले पाहिजे." असे प्रतिपादन प्रवीण मसालेवाले ट्रस्टचे समन्वयक पोपटराव काळे यांनी केले. 

यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले म्हणाल्या, "यापुढे सर्व ग्रंथालये ऑनलाईन होणार असून प्रत्येक ग्रंथालयाने त्वरित आपले ईमेल आयडी बनवून व्हेरिफिकेशन करून घ्यावे, अन्यथा अनुदानाचा पहिला हप्ता मिळणार नाही, असा शासनाचा निर्णय आहे. अधिक मास हा पुरुषोत्तम मास असून या पवित्र महिन्यात प्रवीण मसालेवाले यांनी राबविलेल्या या ग्रंथदान उपक्रमाचे कौतुक करून वाचन संस्कृती वृद्धिंगत होईल", असे मत त्यांनी व्यक्त केले. 

पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सोपानराव पवार म्हणाले, "प्रवीण मसाले ट्रस्टच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात हा ग्रंथ दान उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागात याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. पुढील काळातही ट्रस्ट ग्रंथालयांना मदत करेल. त्यासाठी प्रथम बंद पडलेली ग्रंथालये चालू करून कार्यान्वयीत करावीत. सर्व ग्रंथालयांनी जिल्हा संघाचे सदस्य व्हावे. शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे अक्षांश रेखांश करून ईमेल आयडी अपडेट करावेत."


यावेळी पुणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले, प्रवीण मसाले ट्रस्टचे समन्वयक पोपटराव काळे, प्रमोद ढगे, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजय कोलते, प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार, सहकार्यवाह राजेंद्र ढमाले, विलास चोंधे, राजू घाटोळे, उपाध्यक्ष मार्केंडेय मिठापल्ली, राजू घाटोळे, कोषाध्यक्ष संतोष गोफणे, संचालक अरुण दांगट, ग्रंथमित्र रमेश सुतार, संचालक हनुमंत देवकर, ग्रंथालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शंकर गव्हाणे यांनी सूत्रसंचालन केले. 
0000
close