प्रवीणकुमार मगनलाल शहा यांची रासपाच्या पुणे जिल्हा व्यापारी आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील व्यापारी रूई-बाबीरनगरी चे सुपुत्र प्रवीणकुमार मगनलाल शहा.यांचा 'राष्ट्रीय समाज पक्षामध्ये मुख्य महासचिव माऊली सलगर यांच्या हस्ते जाहीर प्रवेश व*
त्याची 'राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुणे जिल्हा व्यापारी आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी पक्षाचे मुख्य महासचिव माऊली सलगर,पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोफणे, 'पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तानाजीशेठ शिंगाडे, इंदापूर तालुका अध्यक्ष तानाजी मारकड, शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते, परमेश्वर पुजारी, आदी उपस्थित होते,*
यावेळी व्यापारी आघाडीचे नूतन पुणे जिल्हाध्यक्ष प्रवीणकुमार शहा यांनी पुणे जिल्हयामध्ये व्यापारी विभागाची संघटनात्मक बांधणी करून पक्षाची ध्येयधोरण राष्ट्रनायक महादेवराव जानकर यांची विचारधारा तळागाळात पोहोचवण्याचं काम आगामी काळामध्ये करणार आहे, असा निश्चय त्यांनी व्यक्त केला,*

