निमगाव केतकी येथे संत सावता महाराज यांचे हरिनाम सप्ताह सोहळ्यातील ह. भ.प. बाळासाहेब यांचे कीर्तनसाठी आलोट गर्दी.
संसार जरी कठिण असला तरी आलेल्या प्रसंगाला हसतमुख तोंड द्या. - ह.भ.प. भरत महाराज शिंदे उर्फ बाळासाहेब.
इंदापूर प्रतिनिधी: दि १२ श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सुरू असलेल्या कीर्तन मालिकेतील तिसरे दिवसाचे कीर्तन गावरान वेब सिरिज चांडाळ चौकडी फेम , सुप्रसिद्ध अभिनेते व ह. भ. प. भरत महाराज शिंदे ऊर्फ बाळासाहेब यांचे सुश्राव्य किर्तन संपन्न झाले. कीर्तनासाठी निमगाव केतकी व परिसरातील हजारो श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची संख्या लाक्षणिक होती. संपुर्ण परिसर भक्तीमय वातावरणात फुलुन गेला.
आपल्या कीर्तन सेवेतून , मिस्किल विनोदी दाखले देत आजवर लोकांनी बाळासाहेब पाहिले होते. कीर्तनकार भरत महाराज शिंदे यांना अनुभवले. उत्सव कमिटीचे वतीने उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. यावेळी देवराज जाधव , दादाराम शेंडे , पांडुरंग हेगडे , गोरख आदलिंग , बबन खराडे यांचे हस्ते बाळासाहेब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माणिक भोंग , राजू राऊत , संतोष हेगडे सुहास जाधव , संतोष घनवट यांनी सहकार्य केले.

