अतिशय रोमहर्षक साहसदृश्य आणि एक वेगळी प्रेम कहानी यांचा मिलाप आणि त्यातून सामाजिक संदेश या चित्रपटात असणार आहे. तगडी स्टार कास्टिंग आणि दिग्गज तंत्रज्ञ यांना घेऊन आपल्या पहिल्याच निर्मितीत राजाभाऊ आप्पाराव घुले यांनी एक बिग बजेट चित्रपटाची निर्मिती केली आहे.
या चित्रपटाबरोबर ते निर्माता म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहेत केवळ एकच चित्रपट न करता मराठी हिंदी सिनेसृष्टीत वेगवेगळे मनोरंजक आणि बिग बजेट चित्रपटांची निर्मिती करण्याचा प्रसिद्ध निर्माते श्री राजाभाऊ आप्पाराव घुले यांचा मनोदय आहे.
ओमकार फिल्म क्रिएशन अंतर्गत नव्याने सुरू होणाऱ्या निर्मितीत अनेक होतकरू आणि सुप्रसिद्ध अशा कलाकारांना घेऊन वेगवेगळ्या विषयावर चित्रपट निर्मिती करण्याचा मानस निर्मात्यांचा असून अंकुश या चित्रपटाद्वारे याची सुरुवात झाल्याचे निर्माते राजाभाऊ अप्पाराव घुले यांनी सांगितले.
"अंकुश" या आपल्या पहिल्या महिला चित्रपटात दक्षिण सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक, प्रसिद्ध साहसदृश्य दिग्दर्शक, हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक यांचे बहारदार नृत्य असून त्यांचे चित्रीकरण परदेशात करण्यात आले आहे. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक तसेच मराठी सेनेसृष्टीतील तगडी स्टार कास्ट या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येण्यास आता सज्ज झाली आहे.

