महामोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे:- जिल्हा अध्यक्ष साहेबराव वाघमारे
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ८/ वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने २० जुलै रोजी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्रतिल गायरान जमीनीवर अतिक्रमण रहिवास करत असलेल्या सरकारी जागेत शेतकरी, व्यावसायिक, गोर गरीब कुटुंब त्या ठिकाणी राहत आहेत. जिल्हा तालुका शहर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तहसीलदार, नगर परिषद, ग्रामपंचायत यांच्या मार्फत त्या सर्वांना नोटीस देवून पंधरा दिवसात सरकारी कब्जा असलेल्या जागेवर अतिक्रमण व्यावसायिक, शेतकऱ्यांना जागा खाली मोकळी करून सरकारन जमा करावी. अन्यथा पोलीस बंदोबस्त तैनात करून घर दुकान बुलडोझर घेऊन जमीनदोस्त करू अश्या प्रकारे सांगण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष. अ़ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सरकारच्या विरोधात समस्त महाराष्ट्रतिल गोर गरीब, कामगार,शेतकरी, शेतमजूर वंचित घटकातील जनतेच्या बाजूने आवाज उठवला आहे. ज्या जागेवर कोण राहत आहेत त्या जागेवर कुटुंबाच्या नावाने व्यावसायिक दुकान, अल्प भूधारक शेतकऱ्यांना त्या जागेवर कायम करून त्यांच्या नावावर ७/१२ करून देण्यात यावा. भारत देशातील प्रत्येक ठिकाणी संविधानाच्या अधिकार आहे त्रिकूट सरकारने भानावर येवून राज्य सरकारने शासन करावे असे ठणकावून सांगितले. जर तुम्ही तसे न करता हुकुमशाही चाळवली तर तुम्हाला सरकारला धारेवर धरत जनतेच्या बाजूने महा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या २० जुलै रोजी होणार्या मुंबई पावसाळी अधिवेशनात वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष. निलेश भाऊ विश्वकर्मा, भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अशोक भाऊ सोनोने, युवा प्रदेश सदस्य शमीभा ताई पाटील, ऋषिकेश नांगरे पाटील, विशाल गवळी, आफरोज मुल्ला, आमोल लांडगे, चेतन गांगुर्डे, राज्य कार्यकारिणी सदस्य यांनी आव्हान दिले आहे. श्रद्धेय. बहुजनहृदयसम्राट वंचित घटकांचा महामेरू अ़ॅ.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार काल दि . ७ / ७ / २३ रोजी सोलापूर जिल्हा माढा लोकसभा वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष साहेबराव वाघमारे, माजी जिल्हाध्यक्ष गोपाळ काका घार्गे देशमुख, विद्यमान सरपंच जिल्हा कोषाध्यक्ष अभिमान जगताप साहेब, जिल्हा महा सचिव नितीन सरवदे, तालुकाध्यक्ष वैभव जगधने, माजी तालुकाध्यक्ष विकास बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली सांगोला येथे गायरान जमीन अतिक्रमण व्यावसायिक संदर्भात तालुक्यातील मिटींग घेण्यात आली. उपस्थित जनतेला आव्हान करून मोर्चाला तालुक्यातील जास्तीत जास्त धारकांना घेऊन यावे लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून सरकारला जाब विचारण्यासाठी अ़ॅ. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत होणार्या मोर्चाला सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष गोपाळ काका घार्गे पाटील, कोषाध्यक्ष अभिमान जगताप, महासचिव नितीन सरवदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की तालुक्यातील आजी माजी अध्यक्ष, पदाधिकारी, वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी, संबंधित सर्व धारक, आंबेडकर चळवळीतील अनुयायी इं. सर्वांनी तालुक्यातुन मोर्चाला जास्तीत जास्त लोकांना घेवून येऊन बाळासाहेबांच्या आदेशाचे पालन करून वंचित बहुजन आघाडीची ताकत दाखवून देऊ असे माजी जिल्हाध्यक्ष घार्गे पाटील यांनी मत व्यक्त केले. सांगोला तालुक्यातील सर्व उपस्थित असणाऱ्या बहु संख्येने सहभागी झालेल्या पक्षाच्या समविचारी पक्षांना सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मोर्चाला लाखोंच्या संख्येने सहभागी होऊन यशस्वी करण्यासाठी मुंबई चक्का जाम करावे. उपस्थित कार्यकर्त्यांना कोषाध्यक्ष अभिमान जगताप यांनी सांगितले. सांगोला तालुक्यातील उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांचे जिल्हा उपाध्यक्ष कुमार वाघमारे, तालुका अध्यक्ष विकास बनसोडे यांनी आभार मानले.

