shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शरद पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण- सागर मिसाळ

शरद पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण
- सागर मिसाळ.
इंदापूर प्रतिनिधी:शरद पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण कारण पवार साहेबांची व्यक्तिमत्व म्हणजे हिमालय एवढ्या असल्याने राज्याच्या राजकारणातील महागुरू आहेत.असे
दि. ७ जुलै रोजी इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर    इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी  आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या  असून आज शरद पवारांच्या विचाराच्या गटाने इंदापुरात बैठक घेऊन शरद पवार यांना पाठिंबा व्यक्त केला. या बैठकीच्या आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाच्या तालुकाध्यक्ष सागर मिसाळ यांनी व्यक्त केले.

तसेच ते पुढे म्हणाले की,साहेबांच्या विचाराने राज्याची आणि देशाची प्रगती झाली. राजकारणात पन्नास वर्ष करून सर्वाधिक योगदान देणारे व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार आहेत.  आजही देशाचे पंतप्रधान त्यांचे मार्गदर्शन घेऊन कारभार करत असतील तर पक्षातील आमदारांना केवळ स्वार्थासाठी त्यांच्याबरोबर जाण्याची गरज नव्हती. मात्र अजूनही पक्ष एकत्र आला तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आनंदच आहे असे सागर मिसाळ म्हणाले.

शरद पवार साहेब युवकांना बरोबर घेऊन काम करणारे व्यक्तिमत्व असून आज पर्यंत अनेक लोकांना घडवले आहे. राजकारणात हजारो विद्यार्थी घडवणाऱ्या शाळेचे प्राचार्य आहेत. त्यांनी परिसाची उपमा अतिशय तंतोतंत लागू होत असल्याने राज्यातील राजकारणाची गडी विस्कटत असताना पुन्हा सुसंस्कृत पिढी निर्माण करण्यासाठी पवार साहेबांच्या बरोबर राहणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य वाटत असल्याने आम्ही सुप्रियाताई सुळे आणि रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास उत्सुक असल्याचे जेष्ठ  दादासाहेब थोरात यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.


यावेळी छायाताई पडसळकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, शरद पवार यांनी आपल्या महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये  ५० टक्के आरक्षण दिले त्यामुळे आज आम्ही महिला घडलो असे म्हणत त्यांनी शरद पवार यांना पाठिंबा दर्शविला.
 
यानंतर इंदापूर नगरपालिकेच्या समोरील छत्रपती शिवाजी महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अहिल्याबाई होळकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शहरातून पायी फेरी काढून घोषणा दिल्या .

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष उपाध्यक्ष अक्षय कोकाटे,   नानासाहेब भोईटे, साजन डावरे,  अविराज आंबुडकर , समज सय्यद,  श्रीकांत मखरे ,स्वप्निल पवार,रोहन पिसे आदी उपस्थित होते.
close