shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बाल सुधार गृहामध्ये कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन

मुलांना स्पर्श ज्ञान असणे आवश्यक - भाग्यश्री पाटील

प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर : ९ /  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बाल सुधार गृह, अहमदनगर बार असोसिएशन व सेंट्रल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने  आणि माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सुधाकर  यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक ७ जुलै २०२३ रोजी कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन बाल सुधार गृह येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती भाग्यश्री पाटील, सचिव ,जिल्हा विधी सेवा  प्राधिकरण अहमदनगर या होत्या.

 अध्यक्षीय भाषणात बोलताना श्रीमती पाटील म्हणाल्या की , मुलांना स्पर्श ज्ञान असणे आवश्यक आहे .लहान मुलांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श कसा असतो हे समजावून सांगितले .कोणी अनोळखी किंवा ओळखीचा व्यक्ती  आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी करण्यास सांगत असेल तर शिक्षक, ताई, निरीक्षण गृहातील कर्मचारी यांना त्याबाबत सांगा. कसलीही भीती बाळगू नका असे बालकांना आवाहन केले. 

तसेच एडवोकेट श्रीमती रत्ना विंचुरकर- दळवी यांनी बाल न्याय (मुलांचे काळजी व संरक्षण कायदा २०१५ ) या विषयावर मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाला  एडवोकेट श्री जयंत ओहोळ, अध्यक्ष बालकल्याण समिती, अहमदनगर  एडवोकेट श्री अनिल सरोदे, मुख्य लोक अभिरक्षक कार्यालय, अहमदनगर,  श्री बी.बी वारुडकर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अहमदनगर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

कार्यक्रमाची प्रस्तावना एडवोकेट श्री विक्रम वाडेकर विश्वस्त मोहटा देवी ट्रस्ट अहमदनगर यांनी केली. तर सूत्रसंचालन एडवोकेट राजाभाऊ शिर्के, उपाध्यक्ष, अहमदनगर बार असोसिएशन अहमदनगर यांनी केले व आभार प्रदर्शन ऍडव्होकेट अनुराधा येवले पॅनल विधीज्ञ यांनी केले. सदर कार्यक्रमास लोकअभिरक्षक कार्यालयातील एडवोकेट  देठे, एडवोकेट पठारे तसेच एडवोकेट ज्ञानेश्वर दाते, माने मॅडम व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी विकास कर्डिले ,कृष्णा कोंगे ,अश्विनी कवडे हे  उपस्थित होते.
close