इंदापूर तालुक्याच्या शेती सिंचनाच्या, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ - आमदार दत्तात्रय भरणे.
इंदापूर प्रतिनिधी: खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे हे आमचे नेते राहतील मात्र इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनाच्या प्रश्न सोडविण्यासह तालुक्याच्या व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिली असून तालुक्यातील सर्व निवडणुका या पुढे घड्याळ या चिन्हावरच लढविल्या जाणार असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापुर येथील पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या आजी माजी पदाधिकारी, व कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार भरणे पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्याचा विकास अजित पवार यांच्यामुळे झाला आहे.तसेच तालुक्यातील अतिशय महत्त्वाचा प्रलंबित असलेला प्रश्न शेती पाण्याचा असून यामध्ये 22 गावांचा शेती पाण्याचा प्रश्न, खडकवासला कालवा व लाकडी निंबोडी ही योजना तसेच मुळशी धरणातील पाणी इंदापूरला मिळवण्यासाठी व उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी पुन्हा इंदापूर तालुक्याला आणण्यासाठी तसेच तालुक्याच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यांना साथ द्यायचा निर्णय घेतला. मात्र शरद पवार हे आपले सदैव दैवत राहतील खासदार सुप्रिया सुळे यांचा देखील विसर पडू देणार नाही.
शहरातील वीरश्री मालोजीराजे गढीचा विकास असेल किंवा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत चांदशाहवली बाबांच्या दर्ग्याहाचा विकास असेल अशी असंख्य कामे सत्तेत असो वा नसो कामे मार्गी लावायची आहेत अशी ग्वाही दिली.तसेच तालुक्यातील हिंदू मुस्लिम ऐक्य कायम ठेवीत मुस्लिम समाजावर अन्याय होऊ देणार नाही याची खात्री दिली.
तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले,शरद पवार, सुप्रिया सुळे का अजित पवार अशी बाजू घेण्याची वेळ नितीने आणली आहे मात्र संघटन हे एक जीवन आहे.बारामती नंतर इंदापूर तालुका हाच पवार कुटुंबाला सर्वाधिक प्रेम देणारा तालुका आहे. तालुक्याचा विकास करायचा असेल व राहिलेली अर्धवट विकास कामे वेगाने पुढे नेण्यासाठी अजित पवारांसोबत गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील विरोधकांना वाटले की गारटकर शरद पवार यांच्याकडे जातील मात्र मी तीन वेळा विधानसभा लढवली आहे. या तालुक्यातील जनता खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली हे त्यांनी विसरू नये.
माजी सभापती प्रशांत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, धनंजय बाब्रस, विजय शिंदे, अमोल भिसे, अभिजीत रणवरे, भाऊसाहेब सपकळ, इतरांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील,दिपक जाधव, वीरसिंह रणसिंग,दत्ता घोगरे, अतुल झगडे, नवनाथ रुपनवर,अण्णासाहेब धोत्रे,सचिन खामगळ,श्रीधर बाब्रस, बाळासाहेब व्यवहारे,
विठ्ठल ननवरे,अभिजीत तांबिले, दशरथ डोंगरे,बाळासाहेब ढवळे, शुभम निंबाळकर,राजेंद्र गोलांडे, तुकाराम घोगरे, संदेश देवकर, आबा देवकाते ,विजय शिंदे, रेहाना मुलाणी, शिवाजी तरंगे ,सचिन बोगावत, श्रीकांत बोडके, अतुल शेटे, उमा इंगोले, भाऊसाहेब सपकळ ,रणजीत निंबाळकर, इम्रान शेख, वसिम बागवान यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
----------------------------------------
पांडुरंगाला साकडे..
नुकतीच आषाढी एकादशी झाले आहे. पांडुरंगाने पवार कुटुंबामध्ये निर्माण झालेली दुफळी संपुष्टात आणून शरद पवार ,सुप्रिया सुळे ,अजित पवार एकत्र आणावेत यासाठी पांडुरंगाला साकडे घालणार असून लवकरच सर्व काही व्यवस्थित होवो अशी मागणी करणार आहे.

