shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

काही लोक कामे घेतात मात्र ती कामे करत नाहीत आणि दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांवर तात्काळ कारवाई करा.- आमदार दत्तात्रय भरणे.

काही लोक कामे घेतात मात्र ती कामे करत नाहीत आणि दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांवर तात्काळ कारवाई करा.- आमदार दत्तात्रय भरणे.

इंदापूर पंचायत समिती येथील सभागृहात सर्व विभागांच्या तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: काही लोक कामे घेतात मात्र ती कामे करत नाहीत आणि दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांवर तात्काळ कारवाई करा.तसेच इंदापूर शहर तसेच तालुक्यातील विविध विकास कामे वेगाने व वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी उद्दिष्ट निश्चित करून काम करावे तसेच कामच्या दर्जाकडे विशेष लक्ष द्यावे अशी सूचना माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांनी केली.
      इंदापूर पंचायत समिती येथील सभागृहात सर्व विभागांच्या तालुकास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भरणे बोलत होते.यावेळी पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पवार, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता खताळ,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता नाडगौडा, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, नगरपरिषद मुख्याधिकारी रामराजे कापरे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर,सार्वजनिक बाधकाम विभागाचे उप अभियंता भोसले, भुमि अभिलेखचे पिसे,उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिपक चोरमले,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.सुरेखा पोळ, गट शिक्षण अधिकारी अजिंक्य खरात, बाल विकास प्रकल्प अधिकारी संदीप काळे ,अमोल मेरगळ, यांसह इंदापूर, भिगवण व वालचंदनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी, वनविभाग यांसह तालुक्यातील विविध प्रमुख विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
     यावेळी भरणे म्हणाले, इंदापूर तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतून मोठी  कामे सुरू आहेत. काही ठिकाणी काम करताना गावपातळीवर रस्ते मोठ्या प्रमाणावर तोडले जात असल्याचे निदर्शनास आलं आहे. जर रस्तेच राहिले नाहीत तर दळणवळणाची समस्या निर्माण होईल त्यामुळे या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना कडक सूचना द्याव्यात.रस्त्याची तोडफोड न करता काम करावीत.काही ठिकाणी अडचणी आहेत त्या संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ बैठक बोलावून अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करावा.विकास कामात जिथे अडचणी असतील तिथे समेट घडवून काम मार्गी लावा. काही लोक कामे घेतात मात्र ती कामे करत नाहीत आणि दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांवर तात्काळ कारवाई करा.कामात दर्जा न राखणाऱ्यावर कारवाई करीत त्यांना काळ्या यादीत टाका आणि कामे ताबडतोब चालू करा अशा सूचना ही भरणे यांनी अधिकारी वर्गाला दिल्या.तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्त्यांची कामे सुरू आहेत मात्र काही ठिकाणी दर्जेदार कमी होत नाहीत. अशा ठेकेदारांवरती तात्काळ कारवाई करावी तो शासनाचा जावई नाही असा इशाराही भरणे यांनी दिला
   महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवला गेला पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये नळाचे पाणी पोहोचले पाहिजे हा शासनाचा उद्देश आहे ही योजना इंदापूर तालुक्यासाठी महत्त्वाची असून एवढे मोठे पैसे उद्या दुसऱ्या योजनेत विकासासाठी उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे ही कामे मार्गी लावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. कागदी घोडं नाचवण्यापेक्षा अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे असा सल्लाही यावेळी भरणे यांनी दिला आहे.
close