shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना भारताकडे भारतीय दृष्टीकोनातून पाहायला शिकवले- प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे.

स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना भारताकडे भारतीय दृष्टीकोनातून पाहायला शिकवले- प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे.
इंदापूर प्रतिनिधी:
              श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालय भवानीनगर येथे इतिहास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 
स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाश पांढरमिसे सरांनी आणि उपप्राचार्य डॉ.संजय मोरे यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी प्रा. धुळदेव वाघमोडे यांनी मनोगत व्यक्त केले 
               कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे  होते. ते स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करताना म्हणाले,स्वामी विवेकानंदानी शिकागोच्या जागतिक धर्म परिषदेमध्ये भारतीय हिंदू धर्म आणि संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करताना त्यांनी आपल्या भाषणाची सुरवात इथं जमलेल्या  माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी करून सर्व उपस्थितांची मने जिकंली व भारताचा असणारा हिंदू धर्म व संस्कृतीची ओळख जगाला करून दिली. त्यांनी तरुणाईला प्रेरणादायी प्रेरणा देऊन तरुणाई ही राष्ट्राची आधार स्तंभ आहे. तरुणाईने जर मनावर घेतले तर ते आपल्या कार्यकर्तृत्व व कर्तबगारीने जगाला ओळख करून देतील.स्वामी विवेकानंदानी भारतीयांना भारताकडे भारतीय नजरेने पाहायला शिकवले. त्यांना अवघे 39 वर्ष 5 महिने 22 दिवसांचे आयुष्य लाभले. या अल्प आयुष्यामध्ये आपल्या विचार व ज्ञानाने जगाला मोहित टाकताना अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे वधवून घेतले. स्वामी विवेकानंद ही जगाला भारताची ओळख आहे महान कार्य त्यांनी केले आहे. आजच्या तरुणाईने स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला भारत प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्य केले पाहिजे.
          कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपप्रचार्य डॉ.संजय मोरे यांनी केले.प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुवर्णा बनसोडे  यांनी केले तर आभार प्रा. बाबासाहेब चव्हाण यांनी मानले.यावेळी कार्यालयीन अधीक्षक सुशील निंबाळकर व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विध्यार्थी उपस्थित होते.
close