shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पवार साहेब भगवान श्रीकृष्णाच्या रूपात तर अजित पवार अर्जुनच्या भूमिकेत, कार्यकर्ते अभिमन्यूच्या चक्रव्युहात

पवार साहेब भगवान श्रीकृष्णाच्या रूपात तर अजित पवार अर्जुनच्या भूमिकेत, कार्यकर्ते अभिमन्यूच्या चक्रव्युहात

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व तालुका अध्यक्ष संभ्रमावस्थेत : येणाऱ्या आठवड्यात जिल्ह्याला सर्व निर्णय काळविणार 
इंदापूर : आदरणीय पवार साहेब भगवान श्रीकृष्णाच्या रूपात आहेत. सन्माननीय अजितदादा अर्जुनाच्या भूमिकेत आहेत आणि आम्ही सर्व कार्यकर्ते चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यूच्या भूमिकेत अडकलेलो आहोत. त्यामुळे निर्णय काय करावा हे आज तरी तातडीने सांगू शकत नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व तालुका अध्यक्ष व फ्रंटलसेलच्या पदाधिकार्यांनी व्यथा मांडली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली. 


 राज्यात सध्या चाललेल्या घडामोडींवर तालुकास्तरातील कार्यकर्त्यांनी काय निर्णय घ्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे सर्व पदाधिकारी व तालुका अध्यक्ष यांनी धाव घेतली. नेहमीप्रमाणे गारटकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सर्वांची बैठक पुणे येथे बोलावली आणि सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यामध्ये सर्वच तालुका अध्यक्षांनी कोणता निर्णय घ्यावा हे आम्ही तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात सांगतो असे सांगितले. कारण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था आहे. 
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे धनकवडी येथील संपर्क कार्यालयात पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सर्व तालुकाध्यक्ष यांची संयुक्त बैठक आज मंगळवार दि. 4 जुलै 2023 रोजी सकाळी पार पडली. यासंबंधी विचार विनिमय करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष व फ्रंटल सेलचे सर्व पदाधिकारी  उपस्थित राहून सविस्तर चर्चा केली आहे. 
यावेळी माध्यमांना माहिती देताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व तालुकाध्यक्ष यांनी आपल्या व्यथा व अडचणी मांडल्या मात्र यासंबंधी निर्णय घेणे अवघड आहे. तालुक्यात प्रमुख असलेले आमदार, खासदार व काही प्रमुख मंडळी यांना सोबत घेवून त्यांच्या भागात बैठका घेऊन चर्चा व विचारविनिमय करून यासंबंधी निर्णय घ्यावा. अशी चर्चा झाली. येणाऱ्या आठवड्यात आम्ही निर्णय घेणार आहोत असेच प्रत्येकाचे म्हणणे आले. 
संपूर्ण जिल्ह्याचा एक निर्णय होऊ शकत नाही. प्रत्येक तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे निर्णय घेणार, त्यामुळे जिल्ह्याचा एक निर्णय होऊ शकत नाही.   प्रत्येक तालुक्यातून येणारे निर्णय जिल्ह्याला कळवू असे तालुका अध्यक्ष यांनी आम्हांला सांगितले. 
आदरणीय पवार साहेब, अजित दादा पवार व सुप्रियाताई सुळे आमच्या दृष्टीने वेगवेगळे होऊ शकत नाही. जे काही घडले ते अनपेक्षित व धक्कादायक आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी, काही दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. परंतु निर्णय घ्यावाच लागणार आहे, हे कटू सत्य आहे.


 पवार कुटुंब राजकारणात वेगवेगळे होते ही कल्पनाच आम्हाला सहन होत नाही. अशी व्यथा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. तसेच येणाऱ्या काळात आपापल्या स्तरावर पदाधिकारी व कार्यकर्ते योग्य निर्णय घेतील अशी आशा आहे.
close