shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कासिदच्या ५० व्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन संपन्न


सोलापुर प्रतिनिधी:
सोलापूरहून गेल्या ५० वर्षापासून नियमित प्रकाशित होणारे कासिद साप्ताहिक या वृतपत्राचे पन्नासव्या वर्धापनदिन विशेषांकाचे छोटेखानी प्रकाश समारंभ उर्दूचे ज्येष्ठ पत्रकार व घुमता आईना चे संपादक शेख चाँद अकबर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.



कासिदचे अय्यूब नल्लामंदू यांनी आपल्या प्रस्ताविकात कासिद विषयी माहिती विषद करत गत ५० वर्षांचा इतिहास मांडला,
अ.कुदूस नल्लामंदू यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे शेख चाँद अकबर, गुलबर्गा येथील ज्येष्ठ साहित्यिक व कवी सय्यद मुख्तार, मोहमद रियाज खतीब,सुलतान अख्तर यांचा शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. 
यावेळी चाँद अकबर म्हणाले की, एक छोटाश्या साप्ताहिक कासिदने पन्नास वर्षाचा प्रवास करून आपल्या परीने समाजात जनजागृती व राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य मोठ्या निष्ठेने केले आहे. स्वर्गीय अ.लतीफ नल्लामंदू यांनी स्थापन केलेल्या कासिदची सुत्रे त्यांचे सुपूत्र अय्यूब पुढे नेत कासिद ला नवे आयाम देण्याचा प्रयतन करत आहे, ही अभिनंदनास पात्र अशी बाब आहे,
यावेळी प्रमुख पाहुणे मो. रियाज खतीब व सय्यद मुख्तार अहमद दखनी म्हणाले की,आजच्या काळात वर्तमानपत्र चालविणे फार कठीण काम झाले आहे, परंतु अशाही परिस्थितीत कासिद चा ५० वा वर्धापनदिन विशेषांक प्रकाशित करताना मला मोठा मनस्वी आनंद होत आहे, हे वृतपत्र शंभरी पूर्ण करेल अशी आपण प्रार्थना करूयात असेही ते म्हणाले.
शेवटी कासिदचे अबरार नल्लामंदू यांनी आभार मानले.
यावेळी मजहर अल्लोळी, सुलतान शेख,मुसैब सय्यद, आदि मान्यवर उपस्थित होते.

*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close