shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्रात वक्ते घडवणारे माणुसकीचे विद्यापीठ- प्रा. शिवराज आनंदकर सर..!




महाविद्यालयीन काळात वकृत्व स्पर्धेच्या पारितोषिकेतून बहिणीची डिलिव्हरी साठी पैसे जमवणारा विद्यार्थी आज राज्यातील वक्त्यांच्या गळ्यातील ताईत..

      "इतिहास विसरणाऱ्यांचा भविष्यकाळ नसतो म्हणून इतिहास काळजात ठेवून वर्तमानात जगावे तेव्हा भविष्याच्या वाटा कर्तुत्वाने गजबजलेल्या दिसतील" आपले हे वाक्य आम्हा सर्व वक्त्यांच्या ध्येय यात्रेचे शिर्षक बिंदू ठरावे हीच आपल्या वाढदिवसाच्या निमित्त प्रभु श्री राम चरणी प्रार्थना.




     वाढदिवसाच्या प्रा. शिवराज आनंदकर सरांना हार्दिक शुभेच्छा...

            

स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही ज्या गावात महामंडळाची बस पोहोचली नाही अशा खेड्यातून येणारा एक तरुण आपल्या स्वप्नांच्या आणि जिद्दीच्या बळावर  राज्यातील वकृत्व क्षेत्रात फार मोठी क्रांति करतो आणि महाराष्ट्र वकृत्व परिषद नावाची राज्यव्यापी संघटना जन्म घेते. 

     

आपल्या महाविद्यालयीन जीवनात वकृत्वाचा ध्यास अंगी बाळगून ह्या गावातून त्या गावात या शहरातून त्या शहरात सातत्याने प्रवास करत वकृत्वाचे हर एक व्यासपीठ गाजवले पण यशाची धारागळी पडत नव्हती तब्बल अनेक वकृत्व स्पर्धा  हरल्यानंतर ही न थांबता लढत राहिले आणि आयुष्यातली पहिली वकृत्व स्पर्धा सोनई महाविद्यालयाची जिंकली आणि तिथून जो संघर्षमय प्रवास सुरू झाला तो महाविद्यालयीन जीवनात राज्यातील सर्वाधिक तब्बल 798 वकृत्व स्पर्धा जिंकण्यापर्यंत हा विक्रम करणारा राज्यातला हा एकमेव वक्ता ठरला तो  म्हणजे आदरणीय प्रा. शिवराज आनंदकर सर. आज पर्यंत यांच्या आसपास ही कुणी फिरकू शकले नाहीत.

     

आज पूर्ण राज्यात खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र वकृत्व परिषदेच्या माध्यमातून वक्ते उभे करण्याचे, त्यांना व्यासपीठ प्राप्त करून देण्याचे व त्यांच्या हाताला रोजगार देण्याचे देवी काम  आदरणीय शिवराज आनंदकर सर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र वकृत्व परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण करत आहोत आज वकृत्व क्षेत्राकडे तरुणांचा वाढता ओघ व त्यांना मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी हे गेल्या एक दशकात शिवराज आनंदकर सरांनी रात्रंदिवस एक केल्याचे फळ आहे. 

या राज्यातील गोरगरीब विद्यार्थ्याला ही वकृत्वाचा माईक व व्यासपीठ आपलेसे वाटावे यासाठी अनेक व्यासपीठ, वकृत्वाच्या संधी उभ्या करून माझ्यासारख्या अनेक कर्जबाजारी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या  वक्त्यांना घडवण्याचं काम सर आपण केले आहे. 

निस्वार्थी भावनेने स्वतःला एखाद्या क्षेत्रात झोकून देणे काय असते हे मी आपल्या सोबत कोल्हापूरच्या प्रवासात असताना बघितले आहे. दोन दिवस सातत्याने कामाच्या व्यापात असतानाही त्या दिवशी रात्री दोन वाजता आपल्या चेहऱ्यावर प्रचंड झोप होती पण साताऱ्यामध्ये असताना आपण गाडीतून खाली उतरलात आणि एक गार पाण्याची बिसलरी बाटली अक्षरशा झोप जावी म्हणून तोंडावर ओतून घेतली आणि पुढचा प्रवास सुरू ठेवला. आणि सकाळी नऊ वाजता पोहोचून आपण मीटिंग केलीत. सर आपला हा त्याग आपल्यातली ही ऊर्जा आपल्यातला हा गंध आम्हा वकृत्व क्षेत्रातल्या प्रत्येक तरुणाच्या नसानसात उतरला तर आपण करीत असलेल्या धडपडीची निश्चितच क्रांती होऊन त्याचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे. 

     

आपण नेहमी म्हणता लढण्याची ऊर्जा जर तरुणांमध्ये निर्माण करायची असेल तर तरुणांनी वकृत्वाच्या व्यासपीठावर उभे राहिले पाहिजे. कारण वकृत्व स्पर्धांच्या माध्यमातून राज्यभर फिरत असताना हर एक महाविद्यालयावर बोलून यश अपयश पचावण्याची फार मोठी ताकद वकृत्वच आपल्याला देते आणि याची प्रचिती आपल्या कर्तृत्वातून होते आहे. 

   

 बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणं आपण आम्हाला शिकवले. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालायचे नसते हे आपले वाक्य मला.. 'उंच भरारी घेणाऱ्यांना आकाशाचे भान नसते' हे वाक्याची प्रचिती करून देते. 

     

संकटावर कसं तुटून पडायचं हे आपल्याकडून शिकलो. 

     

एक हजारांमध्ये एखादा वक्ता घडत असतो पण त्या घडत असलेल्या व त्याला घडवण्यासाठी संघर्षकाळात प्रा. शिवराज आनंदकर सर तत्परतेने उभे राहतात म्हणून आज राज्यात शेकडो वक्ते टाईट मानेने आपल्या क्षेत्रात उभे दिसतात. 

      

संघटन श्रेणीमध्ये सरांचे व्यक्तिमत्व अद्वितीय आहे याचे कारण वकृत्वावर निस्वार्थ असलेले प्रेम असावे असे मला वाटते कारण राज्यातील कुठलाही  वक्त आर्थिक अडचणीत असताना पहिली पाच-दहा हजाराची मदत ज्याच्याकडून जाते ते नाव म्हणजे  शिवराज आनंदकर सर. सुखाचे माहित नाही पण वक्त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे शिवराज आनंदकर सर.

        

आज राज्यभर वक्तृत्वाची परिस्तिथी पहिली की वाईट वाटते, सगळीकडे फक्त आणि फक्त बेमानी आणि लबाडी चालू आहेत.. पण बेमानीच्या बाजारात आपण इमानदारी चे दुकान चालवताना मला नेहमी आपल्या बद्दल आदर वाटतो..मध्यंतरी मी कोल्हापूर जील्हातून खोटे महाविद्यालयीन लेटर पॉड छापून स्पर्धा करणाऱ्या लोकांचा पडदा जेव्हा फाश केला त्या नंतर ज्या लोकांनी फेसबुक लिव्ह करून आमच्यामुळे आपल्यावर खोटे आरोप केले त्या वेळी आम्हाला खूप वाईट वाटले, पण यावर तुम्ही एकदाही उत्तर दिले नाहीत, हा तुमचां संयम पाहून जगण्याच खूप मोठे गणित आम्हाला तुमच्याकडून शिकायला मिळाले..आजही तुमच्यावर टीका करणारे  तुमच्याच नावाचा वापर करून पोट भरताना अनेक माणसे मी कोल्हापूर सह राज्यातील अनेक भागात पाहतो. पण त्यांना कधीही तुमच्या कामांचा संदर्भ देताना लाजही वाटत नाहीत. पण यावर तुमचे एक वाक्य मला नेहमी आवडते, जगतात ना माझ्या नावावर जगू दे, कधीतरी नियती त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देईल.

             

उद्याच्या वक्तृत्वाची परिस्तिथी काय असेल माहित नाहीत पण आपली लढाई मात्र अपप्रवृत्ती विरुद्ध मोठी असेल यात शंका नाहीत..आपली सारखी प्रामाणिक माणसे जो पर्यंत आहेत तो पर्यंत आमच्या नवोदित वक्त्याना कसलीही भीती नाहीत..

लेखन व शब्दांकन : 

- युवाव्याख्याते, प्रफुल्लजी खपके,

संघटन मंत्री- महाराष्ट्र वकृत्व परिषद

close