शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे मा. चेअरमन, साईबाबा संस्थान शिर्डीचे प्र. जनसंपर्क अधिकारी आणि शिर्डीतील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या शिलधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार जी शेळके यांचा साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्यावतीने वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला, सत्कार प्रसंगी संस्थेचे सहसचिव विलास वाणी तसेच कर्मचारी नवनाथ थोरे, नानासाहेब थेटे, रवींद्र कोतकर, देविदास आसने, नितीन महाले, दिलीप सुपेकर, नरेंद्र निकम आदी कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेचे जेष्ठ कर्मचारी नवनाथ थोरे यांनी कामगारांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.

