व्याहाळी व निमगाव केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात पार..
शिक्षण परिषदेमुळे शिक्षकांना विविध तंत्रे आत्मसात करण्यास वाव मिळत आहे...विजयकुमार परीट (गटविकास अधिकारी, पंचायत समिती इंदापूर.)
निपुण भारत,गुणवत्ता वृद्धी कार्यक्रमांमुळे गुणवत्ता वाढण्यास मदत - संभाजी आजबे(केंद्रप्रमुख)
इंदापूर प्रतिनिधी:दि.२८ ..व्याहाळी व निमगाव केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव येथे पार पडली.प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नंतर केंद्रप्रमुख संभाजी आजबे साहेबांनी प्रास्ताविक केले.नंतर सुलभक भारत ननवरे यांनी पाठ्यपुस्तक वापर,गुणवत्ता वृद्धी कार्यक्रम, नवभारत साक्षरता अभियान,तंबाखूमुक्त अभियान यावर मार्गदर्शन केले.राहुल बनसोडे सरांनी पी जी आय,निपुण शाळा निकष,व्हिडीओ निर्मिती निकष यावर मार्गदर्शन केले..गटविकास अधिकारी विजयकुमार परीट साहेबांनी शिक्षण परिषदेस भेट देऊन शिक्षण परिषदा उपयोगी असून त्या आयोजित केल्याने शैक्षणिक दर्जा वाढत असलेचे दिसून येत आहे हे सांगून इंदापूर विकास गटातील शाळांसाठी मिशन १००% अचिव्हमेंट राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाची माहिती दिली.विस्तार अधिकारी सुनिल मुगळे साहेबांनी मार्गदर्शन केले.
राजेंद्र भोंग व राजकुमार भोंग सरांनी विद्या समीक्षा याबाबत सविस्तर माहिती दिली.नंतर केंद्रात नव्याने आलेले, बदली ने गेलेल्या शिक्षक बंधू भगिनींचा सन्मान करण्यात आला.शिक्षण परिषद चर्चात्मक हसतखेळत पार पडली.

