shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खडतर परीश्रमातून डॉ. श्वेता झाली एम बी बी एस..!


संजय महाजन 
8308964268

धुळे:-बारावीच्या परीक्षेत व नीट परीक्षेत चांगले यश प्राप्त करुन धुळ्याच्या डॉ. श्वेता लोहार हीने सहा वर्षाच्या खडतर परीश्रमानंतर नुकतीच एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त केली आहे.

      २०१७ साली धुळ्याच्या जयहिंद महाविदयालयातून बारावीच्या परीक्षेत व नीट परीक्षेत चांगले यश मिळाल्यानंतर डॉ. श्वेता लोहार हीने वैद्यकीय शिक्षणासाठी रशियातील नामांकीत अशा ओश आंतरराष्ट्रीय विद्यापीठात प्रवेश घेतला. सहा वर्षाच्या परीश्रमानंतर तिने नुकतीच एम.बी.बी.एस. ही पदवी प्राप्त केली आहे.
       डॉ. श्वेता हीचे वडील विक्रीकर अधिकारी असून, आई प्राथमिक शिक्षिका आहे. तिचा मोठा भाऊ डॉ. रोहीत यानेही नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून बी.ए. एम.एस. ची पदवी प्राप्त केली असून तो मराठीतील अनेक चित्रपट व मालिकांमधील आघाडीचा अभिनेता आहे.
   भविष्यात डॉ. श्वेता हिची एम.डी. पदवी प्राप्त करण्याची इच्छा आहे.  डॉ. श्वेता ही ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ञ रामदास वाघ यांची नात आहे . या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
close