shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हाधिकारी साहेब देडगावच्या शेतकऱ्यांचा पोट खराबीचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा ...उपोषण ...उपोषण ...उपोषण

संबंधीत अधिकारी देत आहेत टोलवा टोलवीची उत्तरे

प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : १८ /  अनेक वेळा अर्ज करून तक्रार करून तोंडी समक्ष भेटून शेतीचा पोट खराब विषय मार्गी न लावल्याने कामगार तलाठी, तहसीलदार नेवासा, प्रांताधिकारी महसूल विभागाचे बेजबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई  करण्याबाबत आणि दि .१ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषण करण्या बाबत अहमदनगर जिल्हयातील  नेवासा तालुक्यातील देडगाव येथील दक्ष मित्र सामाजिक संस्था व संबंधीत शेतकरी यांनी दि . १८ जुलै २०२३ रोजी मा. जिल्हा अधिकारी साहेब, अहमदनगर यांना निवेदन दिले आहे .


अर्जदार श्री. शहादेव दत्तात्रय मुंगसे , श्री. आकाश अशोक चेडे , श्री. पोपट अशोक बनसोडे व बालाजी देडगाव ग्रामस्थ यांनी अनेक वेळा
त्यांच्या शेतीचा पोट खराब विषय मार्गी न लावल्याने अर्ज दिले आहेत .

सदर निवेदनात म्हटले आहे की, मौजे बालाजी देडगाव येथील १३० शेतकऱ्यांचा पोटखराबा लागवडीखाली आलेला आहे. बाकी २६९ शेतकऱ्यांचा पोटखराबा बाकी राहिलेला आहे. आम्ही गेले दोन वर्षा पासून कामगार तलाठी देडगाव तसेच नेवासा तहसीलदार, उपविभागीय अधिकारी नगर विभाग नगर यांच्या कार्यालयात वारंवार तक्रार अर्ज विनंती केली. काही शेतकऱ्यांचे पोटखराबा अर्ज तात्काळ तहसीलदार नेवासा यांच्या मार्फत उपविभागीय अधिकारी नगर विभाग नगर यांच्या कार्यालय दाखल होऊन त्यांची पोटखराबा विषय मार्गी लागला आहे . परंतु आम्ही जवळपास दोनशे शेतकरी या पासून वंचित राहिलो आहे तरी आमच्या अर्जावर जे जे कार्यालय, अधिकारी, कर्मचारी यांनी बेजबाबदार काम केले आहे त्यांच्यावर लोकसेवा हक्क कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी व आमच्या रखडलेल्या कामा बाबतीत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती करण्यात आली आहे.

 सदर प्रश्न मार्गी न लावल्यास दि.१ ऑगस्ट २०२३ पासून जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसणार आहोत . या वेळी आमच्या जिवास धोका अथवा कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास सर्व जबाबदारी कामगार तलाठी, तहसील नेवासा प्रांताधिकारी नगर जिल्हाधिकारी यांची असेल असे निवेदनात म्हटले आहे .

सदर निवेदन माहितीस्तव जिल्हा अधिकारी कार्यालय , जिल्हा पोलिस अधीक्षक नगर , राधाकृष्ण पा. विखे, महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच प्रांत अधिकारी नगर विभाग नगर ,मा. तहसील नेवासा , मा. तोफखाना पोलीस स्टेशन, नेवासा, मा. मंडलाधिकारी देडगाव यांना देण्यात आल्याचे दक्ष पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष शहादेव मुंगसे यांनी सांगितले .
close