shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वंचित बहुजन युवा आघाडीचा टेंभुर्णी वीज महावितरणावर बेधडक मोर्चा



वीज महावितरण अधिकारी रस्तोगी यांची तात्काळ बदली रद्द करा अन्यथा उपोषण करु; वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप 

करमाळा: दि. १८/ वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने सोमवार दि. १७/ रोजी वीज महावितरण उपकार्यकारी अभियंता विजयकुमार रस्तोगी यांच्या झालेल्या तडका फडकी बदलीच्या निषेधार्थ टेंभुर्णी शहरात वीज महावितरणावर मोर्चा काढण्यात आला. रस्तोगी यांनी गरीब लोकांना, शोषित, वंचित घटकातील, कुटुंबातील लोकांना वीज जोडणी करून आधारलेली वस्ती उजेडीत केली. वीज महावितरण मंडळातील अधिकारी, कर्मचारी, वायरमन याना रस्तोगी यांनी ग्राहक व जनतेचे काम करण्यासाठी शिस्त लावली होती. त्यांची कामाची पद्धत, ग्राहक तक्रार निवारण अशा अनेक गोष्टी चांगल्या रीतीने संभाळत होते. परंतु टेंभुर्णी शहरात काम करत असताना त्यांचेच काही अधिकारी कर्मचारी यांना हाताशी धरून काही खाजगी कंपनीवाले तालुका व टेंभुर्णी शहरां मध्ये भ्रष्टाचार करून सरकार व जनतेची फसवणूक करत होते. कार्यक्षम अधिकारी विकासकुमार रस्तोगी यांनी त्या ठिकाणचा वीज महावितरण कार्याचा पदभार स्वीकारल्यानंतर या निकृष्ट दर्जाच्या काम करणाऱ्यांवर अंकुश लावला. कामातील हलगर्जीपणा दूर केला शहरातील सर्व प्रकारचा वीज पुरवठा सुरळीत केला ग्राहकाला नम्रता पूर्वक वागणुक दिली शहरातील वीज वितरण कंपनीचे लाखो रुपये थकित वीजबील असताना शंभर टक्के वसुली करून महावितरण कंपनीच्या फायदा केला. खाजगी कंपन्यांना नियम बाह्य कामे देणे बंद केले सामान्य जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला. अधिकारी कसा असावा हे त्या व्यक्तीने वीज महावितरणाला व सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाला दाखवून दिले.

वंचित बहुजन युवा आघाडीचे असे म्हणणे आहे की ढेकणे अँड कंपनीला महामंडळाच्या वतीने कंत्राट येईनात या सर्व गोष्टींचा मनात राग धरून महावितरणातील काही कर्मचारी, अधिकारी व ढेकणे अँड कंपनी यांनी वरीष्ठ पातळीवरील अधिकारी यांच्याशी आर्थिक तड जोड करून ओपन चॅलेंज करून कार्यकाळ पूर्ण होण्या आधीच विकासकुमार रस्तोगी साहेब यांची बदली दुसर्‍या ठिकाणी केली म्हणून वंचित बहुजन युवा आघाडी सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने टेंभुर्णी शहर या ठिकाणी बेधडक मोर्चा काढण्यात आला आणि रस्तोगी साहेब यांची तात्काळ बदली रद्द करा व गुन्हेगारांना कठोर शासन करा असे लेखी निवेदन वीज महावितरण कंपनीला देण्यात आले आहे. या मोर्चाला मार्गदर्शन वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे, माजी जिल्हाध्यक्ष गोपाळ काका घार्गे देशमुख, शहर अध्यक्ष गणेश खरात, रणजित गायकवाड यांनी केले. रस्तोगी यांची तात्काळ बदली रद्द करा व गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा अन्यथा बारामती येथील वीज महावितरणावर पुन्हा मोठा मोर्चा काढण्यात येईल व उपोषणास बसू असा इशारा बहुजन वंचित युवा आघाडी जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी दिला.
close