shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जगात देखणी अण्णाभाऊंची लेखणी डॉ. संजय मोरे

जगात देखणी अण्णाभाऊंची लेखणी डॉ. संजय मोरे 
इंदापूर प्रतिनिधी:
        श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे, श्री छत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.लोकशाहीर,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाश पांढरमिसे यांच्या हस्ते करण्यात आले.
         कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपप्राचार्य डॉ.संजय मोरे होते त्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या विचार कार्याचा आढावा घेताना ते म्हणाले, दीड दिवस शाळेत जाऊन ज्यांनी 35 कादंबऱ्या,22 कथासंग्रह  15लोकनाट्य,1प्रवास वर्णन,8 चिटपट पटकथा, अनेक लावण्या आणि पोवाडे निर्माण करून साहित्यातून सम्राट होणारे ते साहित्यिक बनले त्यांनी विविध वाङ मय प्रकारांमध्ये लेखन केले आहे.त्यांनी अनेक अजरामर साहित्यकृतींची निर्मिती केली आहे. जगातील 27 देशांच्या भाषेत त्यांचे साहित्य अनुवादीत झाले आहे. त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. एक साहित्यिक संवेदनशील मनाचे कलावंत, लोकशाहीर, समजप्रबोधक, विचारवंत, तत्वज्ञ समाजशास्त्रज्ञ अशा वेगवेगळ्या रूपात साऱ्या जगाने त्यांना पाहिले आहे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून तत्कालीन वास्तव परिस्थिवर भाष्य केले."जगात देखणी अण्णाभाऊंची लेखणी" हे त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या साहित्याचा बहुमान आहे. असे मत व्यक्त केले.
        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.प्रकाश पांढरमिसे होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात तेम्हणाले,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती गोरगरिब कष्टकऱ्यांच्या तळहतावर तरलेली आहे. दलित जीवनाचे  समर्थ दर्शन  त्यांच्या साहित्यातून घडते.ते फक्त दिड दिवस शाळेत जावून साहित्याच्या क्षेत्रात एका सामान्य कुटुंबात जन्माला येऊन असामान्य कामगिरी करणारे अण्णाभाऊ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे  साहित्यिक होते. याचा मराठी माणसाला अभिमान असला पाहिजे.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत डफावर थाप मारुन मुंबई महाराष्ट्रात आणण्यासाठी, " माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होतीय काहिली" अशा प्रकारच्या लावण्यांच्या  माध्यमातून  माध्यमातून समाज प्रबोधनपर जनजागृती केली. त्यांच्या या कार्याची नोंद इतिहासात झाली आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांच्या संघर्षमय जीवनापर्यंत आणि वाटेगाव सारख्या खेड्यापासून ते रशियन महानगरापर्यंत चित्रण केले आहे म्हणून त्यांची लेखणी जगात देखणी आहे.
            कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. मारुती अडागळे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा बनसोडे यांनी केले तर आभार प्रा.अंकुश लांडगे यांनी मानले.यावेळी कार्यालयीन अधीक्षक सुशील निंबाळकर व सर्व प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी कर्मचारी उपस्थित होते.
close