shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बाभूळगावच्या नूतन सरपंचपदी रेश्मा सुखदेव गुरगुडे यांची निवड झाल्याबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला सत्कार*

*बाभूळगावच्या नूतन सरपंचपदी रेश्मा सुखदेव गुरगुडे यांची निवड झाल्याबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला सत्कार*

    बाभूळगावच्या ग्रामपंचायतीवर भाजपाचाच झेंडा
 इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाच्या रेश्मा सुखदेव गुरगुडे यांची निवड झाल्याबद्दल राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दि.18 जुर्ले रोजी इंदापूर अर्बन बँकेमध्ये झालेल्या कार्यक्रमात रेश्मा गुरगुडे यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
       हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' भाजप सर्वसामान्य व्यक्तींच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. ग्रामपंचायतच्या सर्व विकासाच्या योजना गतिमान करून सर्वसामान्य जनतेचा विकास करण्यासाठी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी प्रयत्नशील राहावे.'
   माजी मंत्री  व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाभूळगावच्या विकासासाठी आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून असणाऱ्या सर्व योजना प्रभावीपणे राबविणार असल्याचे नूतन सरपंच रेश्मा सुखदेव गुरगुडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
    यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव, व्हाईस चेअरमन सत्यशील पाटील, मार्केट कमिटीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील,निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विलासराव वाघमोडे, ज्येष्ठ नेते कल्याण बापू गुरगुडे, भास्कर गुरगुडे, दिपक गुरगुडे, उपसरपंच नागनाथ गुरगुडे, दादासाहेब भोसले,दिनेश वाईकर, महावीर यादव, विठ्ठल मोरे , मधुकर खिलारे , पंडित गुरगुडे, राजु इंगळे उपस्थित होते.
close