लोकप्रिय आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या प्रयत्नाने तंत्रज्ञ, नर्सची पदे मंजूर
प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज विधानसभा मतदारसंघातंर्गत येणाऱ्या उपजिल्हा रूग्णालय, केज येथील नविन डायलिसिस युनिट करीता रिक्त पदे भरण्यात यावीत म्हणून आ.नमिता मुंदडा यांनी जो पाठपुरावा केला. त्याला आता यश आले आहे. आरोग्य सेवा व अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागाचे आयुक्त यांनी याप्रकरणी केज येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या डायलिसिस युनिट करीता पदे मंजूर केली आहेत. या कामी नंदकिशोर मुंदडा (काकाजी) यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. नंदकिशोर मुंदडा यांच्या पाठपुराव्याला व आ. नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
मागील काही वर्षात किडनीसी संबंधित आजारी रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. असंख्य रुग्णांना डायलिसिस साठी बीड किंवा अंबेजोगाई रुग्णालयात उपचार करण्यासाठी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा (काकाजी) यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे रुग्णांना इतरञ जावे लागण्याची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. व डायलिसिस करणे आवश्यक असणाऱ्या रुग्णांना केज ग्रामीण रुग्णालयातच चांगले उपचार मिळणार आहेत.

