एन.ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथे पालक मेळावा संपन्न.
पालक मेळाव्यात बांगर्डे पंचक्रोशीतील दानशूर मंडळीचा सन्मान .
मुलांना नीरा नदीपात्रातील होडीतून ये जा करण्यासाठी होडी चालकाला केले भरीव अर्थसहाय्य.
इंदापूर प्रतिनिधी: निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे एन.ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर( ता. इंदापूर जि. पुणे )येथे पालक मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे व प्रमुख अतिथी म्हणून चंद्रकांत विठ्ठल मदने हे होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून बांगर्डे पंचक्रोशीतील दानशूर मंडळीचा सन्मान करण्यात आला. या दानशूर मंडळींनी बांगर्डे गावाहून निमसाखर हायस्कूल मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलांना नीरा नदीपात्रातील होडीतून ये जा करण्यासाठी होडी चालकाला भरीव अर्थसहाय्य केले. तसेच या भागातून निमसाखर हायस्कूलमध्ये अनेक वर्षापासून इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे खूप विद्यार्थी शिक्षण घेतात. सर्व विद्यार्थी होडीतून ये जा करत असतात. त्यासाठी काही दानशूर व्यक्तींनी, त्यामध्ये, चंद्रकांत मदने, महादेव काळे, शत्रुघ्न बर्गे, मोहन चव्हाण, गणेश केंगार, श्रीरंग मेटकरी, बाबीर शेठ मेटकरी, आनंदराव दडस, अमोल चव्हाण, हनुमंत मोरे, राजू मेटकरी, अशोक वाघमोडे, विजय वाघमोडे, विशाल चव्हाण, राहुल चोपडे, पप्पू मेटकरी व योगेश दडस यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचा सन्मान संस्थेचे सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे, प्राचार्य चंद्रकांत रणवरे, पर्यवेक्षक मधुकर शंकरराव खरात, जुनिअर कॉलेज विभाग प्रमुख चंद्रकांत बलभीम बोंद्रे, ज्येष्ठ शिक्षक सूर्यकांत किसवे, प्रमोद चव्हाण, यांच्या हस्ते करण्यात आला .
संस्था उपाध्यक्ष संजय सूर्यकांत रणवरे उर्फ पप्पू पाटील यांनी देखील सर्व दानशूर मंडळींचे अभिनंदन केले.
महादेव काळे गुरुजी यांनी व्हाट्सअप ग्रुप मधून आर्थिक मदतीची हाक मारताच अवघ्या दोन तासांमध्ये दहा हजार रुपयाचा निधी गोळा करून देण्यात आला. निमसाखर हायस्कूल वर एवढं अतोनात प्रेम करणारे ही मंडळी पाहून खरोखरच खूप आनंद वाटला.
या कार्यक्रमा वेळी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
त्यावेळी अनेक पालकांनी विद्यालयांमध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टी बद्दलची चर्चा केली. आपली मुले हीच आपली संपत्ती आहे. त्यांच्यावर उत्तम संस्कार घडवणे आपले पहिले कर्तव्य आहे. आपल्या मुलांचा बौद्धिक आणि मानसिक विकास झाला पाहिजे. याचा विचार प्रत्येक पालकांनी केला पाहिजे. खूप वर्षापासून संस्थेचे पंचक्रोशीतील प्रत्येक पालकांचे खूप जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत ते असेच वृद्धिंगत होत गेले पाहिजे. आज पालक मीटिंगमध्ये ज्या विषयावरती, समस्यांवरती विचार विनिमय झाला त्याचा नक्कीच सकारात्मक विचार करू असे मत संस्था सचिव धनंजय रणवरे यांनी व्यक्त केले. सर्व पालक देखील खूप समाधानी झाले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने सर्वजण कार्यरत आहेत. नक्कीच आपण दिलेल्या सर्व सूचनांचे आम्ही स्वागत करत आहोत. आगामी काळामध्ये मुलांचे बसेसचे प्रश्न, वाहतुकीचे प्रश्न, शाळेत ये जा करण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संस्थेसह आम्ही सर्वजण प्रयत्नशीलआहोत असे मत प्राचार्य चंद्रकांत रणवरे यांनी व्यक्त केले व उपस्थित सर्व पालकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाने केले. प्रास्ताविक सोनाली शेंडे मॅडम यांनी केले तर वैभव हणमंते सरांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजिनाथ मलगुंडे सरांनी केले.

