माळवाडी ग्रुप ग्रामपंचायत तिच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाठिंबा.
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी प्रदीप गारटकर यांची निवड झाल्याबद्दल केले अभिनंदन.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील माळवाडी ग्रुप ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षप्रदीप गारटकर यांनी शिंदे फडणवीस सरकारच्या बरोबर जाण्याचा घेतलेला निर्णयाचे स्वागत प्रदीप गारटकर यांना पुष्पगुच्छ देऊन पाठिंबा दर्शवला. तसेच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष पदी प्रदीप गारटकर यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
यावेळी माळेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी बाळासाहेब व्यवहारे, उपसरपंच प्रतिनिधी भास्कर मदने, सदस्य गणेश भोंग, माऊली गार्डे, सुहास गार्डे, ज्ञानदेव गार्डे ,सतीश ठवरे, सचिन गोपने, उत्तम म्हेत्रे, तसेच इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक सचिन ठवरे, युवक उपाध्यक्ष सागर सातपुते, इंदापूर तालुका उपाध्यक्ष दीपक रायकर,रणजीत सातपुते,गणेश इजगुडे, सचिन व्यवहारे, इंदापूर तालुका विद्यार्थी अध्यक्ष सागर व्यवहारे, अनिकेत व्यवहारे, अतुल शिंदे, दादा गार्डे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

