वालचंदनगरचे अतुल आंधळे यांची ग्लोबल एम्मिनेन्स अवार्ड २०२३साठी निवड.
प्रा.चेतन मोरे यांनी केले अतुल आंधळे यांचे अभिनंदन.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील सुपुत्र यश हृदयालय फाउंडेशन चे अध्यक्ष अतुल मारुती आंधळे यांनी सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ५ ऑगस्ट २०२३ रोजी हा सन्माननीय पुरस्कार औपचारिकपणे प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती डी वाय पाटील युनिव्हर्सिटीचे चेतन मोरे यांनी दिली व अतुल आंधळे यांचे सदर अवॉर्ड मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.
वालचंदनगर येथील अतुल आंधळे यांनी यश हृदयालय फाउंडेशन वालचंदनगरच्या वतीने सामाजिक कार्य केले. तसेच हार्ट संदर्भात सर्व आजारावर ऑपरेशन करून बेंगलोर वरून आणण्याचे कार्य केले आहे. तसेच रक्तदान शिबिर, महिलांसाठी होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम करणे,डोळ्यांच्या शिबिर आयोजित करणे, स्पोर्ट्स ,बॅडमिंटन स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा आणि पशु पक्षी संवर्धन आणि नैसर्गिक संवर्धन जोपासणे इत्यादी क्षेत्रातील विविध कामे अतुल आंधळे यांनी केले आहेत.

