shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

*एन.पी. इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि.पुणे तर्फे भिमाई आश्रमशाळेत २०० दप्तरांचे वाटप.*

**एन.पी. इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि.पुणे तर्फे भिमाई आश्रमशाळेत २०० दप्तरांचे वाटप.*
*इंदापूर प्रतिनिधी* (दि.१४) :- संत तुकाराम महाराज पालखी मार्ग इंदापूर ते तोंडले - बोंडलेचे विकसक (राष्ट्रीय महामार्ग -९६५ जी.) एन.पी. इन्फ्रा. प्रोजेक्ट प्रा.लि.पुणे. शाखा - सुरवड या नामांकित कंपनीच्या वतीने भिमाई आश्रमशाळेत गरजू विद्यार्थ्यांना २०० दप्तरांचे वाटप करण्यात आले.

यावेळी कंपनीचे एम.डी.नितीन तापडिया, राजेंद्र घोरपडे, रोहित घोरपडे,प्रोजेक्ट मॅनेजर लालबहादूर सिंग, गणेश बाबू, दीपक हूद्दार, शेंडे साहेब,एन.डी गोपाळ, हनुमंत घाडगे, दिगंबर गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांचा मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने अध्यक्षा शकुंतला मखरे,सचिव ॲड.समीर मखरे, मुख्याध्यापक साहेबराव पवार आदींनी स्वागत करून यथोचित सत्कार केला.

यावेळी आपल्या मनोगतात संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे यांनी एन. पी. इन्फ्राच्या विधायक कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले. तर आभार हिरालाल चंदनशिवे यांनी मानले.
close