shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मणिपूर मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारा विरोधात शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन



सर्व जागृक संस्था संघटनांनी आंदोलनात सहभागी व्हावे:- अ़ॅ. सविता शिंदे

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २७/ मणिपूर मध्ये तीन महिलांवर अत्याचार करून त्यांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आल्याच्या निषेधार्थ शुक्रवार दि. २८/ ७/ २०२३ रोजी करमाळा येथील तहसील कार्यालयासमोर एक तासाचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 

मणिपूर मध्ये झालेली घटना अतिशय निंदनीय, निषेधार्ह, माणुसकीला काळिमा फासणारी व महिलांच्या सन्मानावर पूर्णपणे गदा आणणारी आहे. गुन्हा घडून दोन महिने झाल्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल झाला परंतु सरकार त्याविरुद्ध काहीही करत नाही. जवळपास तीन महिन्यापासून मणिपूर जातीय हिंसाचारात जळत असूनही पंतप्रधान त्यावर साधे निवेदन देखील देण्यास तयार नाहीत. परिणामी महिलांवरील अत्याचारात वाढ होते आहे. 

याविरुद्ध शुक्रवार दि. २८/०७/२०२३ रोजी सकाळी ११:३० वाजता १ तासाचे धरणे आंदोलन तहसील कार्यालय करमाळा येथे करण्यात येणार आहे. सर्व जागृक संस्था संघटनांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी आपण सर्वांनी महिलांवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सदर आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन व विनंती अ़ॅ. सविता शिंदे यांनी केली आहे.
close