shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर शहरात कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा.

इंदापूर शहरात कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा.

इंदापूर प्रतिनिधी: जय हिंद माजी सैनिक संघटनेच्या वतीने इंदापूर शहरात कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भारतीय सैन्यातील माजी सैनिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातून भारत माता की जय, वंदे मातरम्, शहिद जवान अमर रहें अशा घोषणा देत तिरंगा रॅली काढली. याप्रसंगी शहरातील महापुरूषांच्या पुतुळ्याना अभिवादन करत नगरपरिषद प्रांगणातील स्वातंत्र्य सैनिक स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पन करीत शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.तसेच इंदापूर रोटरी क्लबच्या वतीने विरपत्नी तसेच माजी सैनिक यांचा सन्मान करण्यात आला.
             
इंदापूर शहरातील पुणे-सोलापूर महामार्गावरील छत्रपती मालोजीराजे भोसले चौकातून दुचाकीवरुन या तिरंगा रॅलीला सुरवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करुन ही तिरंगा रॅली बाबा चौक येथून नगरपरिषद प्रांगणात दाखल झाली. या ठिकाणी असलेल्या स्वातंत्र्य सैनिक स्मृतिस्तंभास अभिवादन करीत कारगील युद्धात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सैनिकांना पुष्पचक्र अर्पन करण्यात आले.
     
यावेळी इंदापूर रोटरी क्लबच्या वतीने विरपत्नी सुवर्णाताई डोईफोडे, हेमलताताई साबळे यांचा तसेच माजी सैनिक मेजर कैलास गवळी, मेजर रविराज पवार, मेजर मारुती मारकड, मेजर महादेव सोमवंशी यांचा सन्मान करण्यात आला.या तिरंगा रॅली मध्ये जय हिंद आजी-माजी सैनिक संघटना, युवा क्रांती प्रतिष्ठान, शिवभक्त परिवार, रोटरी क्लब ऑफ इंदापूर, कामधेनु सेवा परिवार, इंदापूर नागरी संघर्ष समिती यांच्यासह विविध सामाजिक संस्था यांनी सहभाग घेतला.
     
 यावेळी डॉ.लक्ष्मण आसबे, प्रशांत शिताप, गफूर सय्यद,प्रा.कृष्णा ताटे, रोटरी क्लबचे अध्यक्ष आझाद पटेल, माजी अध्यक्ष नरेंद्र गांधी, धरमचंद लोढा,तानाजी धोत्रे,हमीद आतार, महादेव चव्हाण, जयंत नायकुडे,प्रकाश खांबसवाडकर, सुभाष थोरात, जगताप, रामदास कुदळे, यांच्यासह इंदापूर शहरवासीय उपस्थित होते.या कार्यक्रमाचे 

आयोजन जय हिंद आजी-माजी सैनिक संघ इंदापूर यांच्या वितीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मेजर रविराज पवार यांनी तर प्रास्ताविक मेजर कैलास गवळी यांनी केले
close