shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आईचं दूध तेच गाईच दूध म्हणतात ...भिंगारच्या युवकांनी केले जखमी गाईवर उपचार


प्रतिनिधी : संजय वायकर   

नगर : २६ /  आईचं दूध तेच गाईच दूध म्हणतात ,पण  बाईला वाचवणारा हिरो आणि गाईला वाचवणारा गुन्हेगार अशी मानसिकता असलेल्या या जगात निस्वार्थ गौसेवा करणारे खूप कमी लोक असतात त्यातीलच  काही भिंगार शहरातील युवकांनी एका जखमी गोमातेवर उपचार करून मुक्या  प्राण्यांना मदत करण्याचा त्यांच्या कृतीतुन संदेश दिला आहे .

 दिनांक २६ जुलै २०२३ रोजी भिंगार नाका येथे एका गोवंशाच्या पाठीवर जखम असल्याचे निदर्शनास आले. 
        
तेथे सामाजिक कार्यकर्ते श्री. सतीश (नाना) मोरे, दिपक धोत्रे, विजय घोरपडे, निरंजन नन्नवरे व त्यांचे मित्रपरिवार  हे त्या गौमतेचा ठिकाणी जमले व त्या गौवंशाच्या जखमेवर उपचार केले .
close