shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन इतर जिल्ह्यात वाहतुक करण्यास मनाई


अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
 भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल-निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत अहमदनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने कालावधीत जनावरांसाठी चा-याची टंचाई परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.
 
 
जिल्ह्यात मागील वर्षीच्या पेरणी अहवालानुसार १ एप्रिल २०२३ पासून  ३०४१०२२ में टन चारा शिल्लक असून तो अंदाजे ३.८ महिने पुरेल. चा-याची उपलब्धता पाहता भविष्यात टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हादंडाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करत अहमदनगर जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन (टीएमआर) यांची इतर जिल्ह्यात वाहतुक करण्यास मनाई आदेश जारी केला असुन  हा आदेश पुढील दोन महिन्याच्या कालावधीकरीता लागू राहणार आहे.


*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - *9561174111*
close