shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रा. ब. नारायणराव बोरावके महाविद्यालयातील भूगोलशास्त्र विभागातील ७ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये (MNC’S) विविध पदांवर निवड..!


 
श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयातील भूगोलशास्त्र विभागात शैक्षणिक वर्ष २०२२-२३ एम.ए भाग दोन मध्ये शिकणाऱ्या सात विद्यार्थ्यांची निवड भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आधारित व्हिजन जिओ टेक आणि जेनेसिस या बहुराष्ट्रीय आयटी कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. यामध्ये नन्नवरे आकाश आसाराम व माकोने अपेक्षा गोपीनाथ यांची निवड व्हिजन जिओ टेक, बारामती तर लोणारे रोहिणी आसाराम, पवार अजय गणेश, बनसोडे आकाश बाबासाहेब आणि राऊत सौरभ अंकुश या चौघांची जेनेसिस इंटरनॅशनल कार्पोरेशन लिमिटेड, मुंबई या ठिकाणी निवड झाली. तसेच खेडेकर कोमल नानासाहेब या विद्यार्थिनीची महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलात निवड झाली. 


या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन मा. मीनाताई जगधने चेअरमन रयत शिक्षण संकुल, श्रीरामपूर आणि मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. पी.व्ही. बडधे यांनी केले. सदर विद्यार्थ्यांना भूगोल विभाग प्रमुख प्रो.डॉ. एस. पी. चोळके व इतर सहकारी प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील भूगोल विभागातून एम ए पास विद्यार्थ्यांची दरवर्षी विविध क्षेत्रात तसेच विशेषतः भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आधारित IT कंपन्यांमध्ये निवड होत असते. सदर विभागातील विद्यार्थी आज विविध जीआयएस आयटी कंपन्यांमध्ये तसेच सरकारी कार्यालयात उच्च पदावर कार्यरत आहेत, तसेच अनेक विद्यार्थी आयटी क्षेत्र, महसूल विभाग, जमीन मोजणी विभाग (भूमिअभिलेख), वन विभाग, भारतीय सर्वेक्षण विभाग, आपत्ति व्यवस्थापन,सिटि सर्वे, पोलीस दल या ठिकाणी कार्यरत आहे. भविष्यातही भूगोलशास्त्र या विषयात रोजगाराच्या विशेष संधी उपलब्ध असणार आहेत. असे प्रतिपादन महाविद्यालयातील भूगोलशास्त्र विभाग प्रमुख तसेच उपप्राचार्य डॉ.एस. पी.चोळके यांनी केले.

*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111
close