shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विठ्ठलाच्या दिंडीला 'गीतमंच्याची' जोड..!



शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)

विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व डी.पी.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आषाढी एकादशी निमित्त 'गीतमंच' तर्फे आयोजित गायनाचा कार्यक्रम तसेच पालखी आणि दिंडीच्या कार्यक्रम उत्साहात आणि सुनियोजित पद्धतीने संपन्न झाला.   सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती.सुरेखा परदेशी मॅडम शिक्षक प्रतिनिधी तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.अनिल खामकर सर यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यास नियामक मंडळ सदस्य तसेच शाला समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर, शाला समिती सदस्य,  श्री.ॲड संदीपजी अगरवाल, श्री. धीरुभाई टेलर, श्री.राजेशजी मेहता यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विशेष आकर्षण म्हणजे  श्री.धीरुभाई टेलर व राजेशजी मेहता यांनी गीत गायनाच्या  कार्यक्रमात सहभाग घेऊन सर्वांना प्रोत्साहन दिले. 

        पालखी सोहळ्याचा भव्य कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी वारकरी वेशभूषामध्ये विठ्ठल नामाचा गजर करत पालखीमध्ये सहभागी झाले. कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापिका सौ.सुनीता ढिले, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका क्षमा देशपांडे मॅडम उपस्थित राहून कार्यक्रमाचे शोभा वाढवली. सौ. ढिले मॅडम, श्री. धनंजय काळे सर, श्री. विक्रम शिंदे सर, सेवक श्री. गजानन कदम, श्री.जयराम उंबरे यांनी गीत गायनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. सोहळ्यामध्ये श्री.योगेश कोठावदे सर आणि श्री. गजेंद्रगडकर सर यांनी पांडुरंगाष्टकाचे पठण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सोमनाथ ढुमणे यांनी केले. शेवटी आरती व प्रसाद वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला.
 
     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.महेश चोणगे सर, श्री. चंद्रकांत जोशी सर क्रीडा शिक्षिका सौ. वैशाली तारू मॅडम, वर्गशिक्षक, अन्य शिक्षक वृंद आणि सेवकवर्गानी सहभाग घेतला.
close