shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम घेत ना.बच्चू कडू यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न


राजेंद्र बनकर - शिर्डी
दिव्यांग हृदयसम्राट ना.बच्चू कडू यांचा शिर्डी शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवत  वाढदिवस साजरा करण्यात आला.अनावश्यक खर्चाला फाटा देऊन शिर्डीतील प्रहार क्रांती संस्था व दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.यात नांदुर्खी येथे वृक्षारोपन कार्यक्रम तर दिव्यांग बांधवांनी श्री साईनाथ रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले.शिर्डी येथील साई सावली बाल गृहात संस्थेच्या वतीने मुलांना तीन महिने पुरेल असे  धान्य व मुलांना खाऊ वाटप करुन केक कापून वाढदिवस साजरा केला.

यावेळी  नितीन चौधरी , नवनाथ गमे ,कैलास यादगुडे , नितीन भनसाळी, सुनिल आरणे ,सुरेश गुगळे , खुशाल पठाण , गौतम घनघाव ,संतोष वागमारे , नंदकिशोर राय ,अमोल गांगुर्डे , नवनाथ पुंड , उमेश बडगुजर ,आशा भराटे ,मंगल जाधव ,आकाश जाधव ,ताहिर सय्यद , राजेंद्र गमे , सुनिल रणदिवे , रमेश साळुंके ,आशा गिते आदीसह संस्थेचे सदस्य उपस्थित होते.
नितिन चौधरी व प्रहार दिव्यांग क्रांती संस्था शिर्डी शहर अध्यक्ष कैलास यादगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे.

*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close