ना.मा.प्रवर्गाची एक जागा कमी झाल्याने काहींची नाराजी मात्र राजकीय हालचालींना, राजकीय गणीतं बदलणार?
चंद्रकांत झुरंगे -'भोकर
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर ग्रामपंचायतीत पुन्हा महिला राज येणार असून येथे असलेल्या १५ सदस्य संख्येपैकी ८ महिला सदस्य असणार आहेत तर ७ पुरूष सदस्य संख्या असणार आहे. येथे ग्रामपंचायत आरक्षण सोडतीसाठी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत उपस्थीत ग्रामस्थांनी या आरक्षण सोडतीस मंजूरी दिली असून त्यानंतर येणार्या हरकतीवर उपविभागीय अधिकारी अभिप्राय देतील लवकरच त्यास जिल्हाधिकार्यांची मान्यता मिळणार आहे. मात्र या आरक्षणात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत न्यायालयाच्या आदेशाचा धाक दाखवत प्रशासनाने नागरीकांचा मागास प्रवर्गाची एक जागा कमी केल्याने या प्रवर्गातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे राजकीय हालचालींना वेग आला असून यावेळी बदलत्या राजकीय गणीतांबरोबरच येथील गणीतं बदलणार आहेत.
भोकर ग्रामपंचायत सदस्य मंडळाची मुदत गेल्या जानेवारीत संपलेली आहे, तेव्हा पासून येथे पंचायत समीतीचे कृषी अधिकारी अजीतानंद पावसे हे प्रशासकीय सरपंच म्हणून काम पाहत आहेत. येथे असलेल्या १५ सदस्य संख्येत नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी 4 जागा होत्या परंतू आता उच्च न्यायालयाचे दि.२२ जुलै २०२२ च्या आदेशानुसार लोकसंख्येच्या तुलनेत ५० टक्केपेक्षा जास्त आरक्षण न देण्याच्या आदेशानुसार हे आरक्षण बसविले असल्याचे तलाठी अशोक चितळकर व ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे यांनी सांगीतल्यानंतर या प्रवर्गातील अनेकांनी नाराजी व्यक्त करत आमचेच आरक्षाला कात्री का लावली असा सवाल केला असता संबधीतांनी उर्वरीत आरक्षणाची टक्केवारी फिक्स असल्याने हा निर्णय शासनस्तरावर झाल्याचे सांगण्यात आले.
येथे असलेल्या ६५९३ मतदारंपैकी ८१३ मतदार अनुसूचीत जातीचे आहेत तर ८३४ मतदार हे अनुसचीत जमातीतील आहेत. येथेक असलेल्या पाच प्रभाग मिळून प्रत्येकी तीन सदस्य या प्रमाणे एकुण १५सदस्य निवडूण द्यायचे आहेत. त्यात येथील प्रभाग क्र.१ मध्ये १२८२ मतदारांना तीन सदस्य निवडायचे आहेत त्यात सर्वसाधारण करीता एक, अनुसचीत जाती महिला एक व सर्वसाधारण स्त्री एक या प्रमाणे तीन सदस्य असणार आहेत तर प्रभाग क्र. २ मध्ये असलेले १३२५ मतदारांना तीन सदस्य निवडूण द्यायचे आहेत, त्यात सर्वसाधारण करीता एक, नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री करीता एक व सर्वसाधारण स्त्री करीता एक जागा असे तीन सदस्य असणार आहेत.
प्रभाग क्र.३ मध्ये असलेल्या १३०२ मतदारांना तीन सदस्य निवडूण द्यायचे आहेत त्यात अनुसचीत जमाती व्यक्तीसाठी एक, नागरीकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती करीता एक, सर्वसाधारण स्त्री करीता एक जागा अशा एकुण तीन जागा असणार आहे तर प्रभाग क्र.४ मध्ये असलेल्या १३३३ मतदारांना तीन सदस्य निवडूण द्यायचे आहेत त्यात सर्वसाधारण व्यक्ती करीता एक, अनुसूचीत जमाती स्त्री करीता एक जागा व सर्वसाधारण स्त्री करीता एक जागा असणार आहे. प्रभाग क्र.५ मध्ये असलेल्या १३५० मतदारांना तीन सदस्य निवडुन द्यायचे आहेत त्यात अनुसूचीत जाती व्यक्ती साठी एक, सर्वसाधारण व्यक्तीसाठी एक व नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री करीता एक जागा असणार आहे.
एंकदरीत येथे असलेल्या १५ सदस्यात अनुसूचीत जाती व्यक्तीसाठी एक, अनुसूचीत जमाती व्यक्तीसाठी एक, नागरीकांचा मागास प्रवर्गाकरीता एक, सर्वसाधारण व्यक्ती करीता ४,अनुसूचीत जाती स्त्री करीता एक, अनुसूचीत जमाती स्त्री करीता एक, नागरीकांचा मागास प्रवर्गस्त्रीयासाठी दोन व सर्वसाधारण स्त्रीकरीता ४ जागा असे एकुण १५ सदस्य असणार आहेत त्यात पुरूष सदस्य ७ व स्त्रीया सदस्य आठ असणार आहे, शिवाय येथील सरपंचपद स्त्रीराखीव असल्याने सरपंचासह ९ स्त्रीया असणार आहेत.
या ग्रामपंचायतीच्या गेल्या पंचवार्षीक निवडणुकीत सत्ताधारी माजी आमदार भानुदास मुरकूटे गट, विरोधी माजी नगराधय्क्ष व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे गट व माजी सभापती दिपक पटारे यांचे गटाने केलेली तीसरी आघाडी अशी तीरंगी लढत झाली होती. परंतू आता बदलत्या राजकीय समीकरणानुसार मुरकूटे व ससाणे यांची युती झालेले असली तरी येथे सध्या महसुलमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांचा स्वतंत्र गट आहे, त्याच बरोबर आमदार लहु कानडे यांचाही गट सक्रीय असल्याने आता येणारा काळच ठरविणार आहे, गेल्या पंचवार्षीक निवडणुकीप्रमाणे येथे पुन्हा तीरंगी लढत होणार की मुरकूटे-ससाणे विरूद्ध नामदार विखे गट व आमदार कानडे गटात युती होवून सरळ दुरंगी लढत होणार लवकरच स्पष्ट होणार आहे.
काही असले तरी गेल्या पंचवार्षीक निवडणुकीत नागरीकांचा मागास प्रवर्गाकरीता चार जागा होत्या परंतू न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत येथे आता नागरीकांचा मागास प्रवर्गातून तीन सदस्य असणार आहे. या निर्णयामुळे सर्वसाधारणची एक जागा वाढलेली आहे. या प्रभागनिहाय आरक्षणास नुकत्याच झालेल्या ग्रामसभेने मंजूरी दिली असून येत्या दि.१४ जुलै रोजी जिल्हाधिकार्यांची मान्यतेने येथील प्रभाग रचनेला मुर्त स्वरूप येणार आहे.
या ग्रामसभेस अध्यासी अधिकारी म्हणून पंचायत समीतीच्या कृषी विस्तार अधिकारी सुवर्णा तोडमल, ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे, तलाठी अशोक चितळकर यांचेसह सोसायटीचे अध्यक्ष किशोर छल्लारे, काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष सुदाम पटारे, सोसायटीचे संचालक महेश पटारे, सागर शिंदे, भाजपाचे सतीष शेळके, बाळासाहेब विधाटे, गणेश कांबळे, राजीव तागड, सुरेश अमोलीक, डॉ. श्रेयश शिंदे, इंद्रभान दिवटे, राहुल अभंग, राजेंद्र चौधरी, भागवतराव पटारे, कारभारी तागड, पप्पू थोरात, भाऊसाहेब चव्हाण, बाबासाहेब तागड, ज्ञानदेव चव्हाण, मारूती डूकरे, छबु डूकरे, कचरू वाकडे आदिंसह ग्रामस्थ उपस्थीत होते.
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

