shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंत्योदयाचा विचार हेच भारतीय राज्यघटनेचे ध्येय : न्या. सुधाकरजी यार्लगड्डा


अहमदनगर प्रतिनिधी :
समाजातील शेवटच्या माणसाचा विकास,वंचित घटकांना विकासाच्या रांगेत आणणे अर्थात अंत्योदयाचा विचार हेच भारतीय राज्यघटनेचे ध्येय आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र  न्यायाधीश तथा अध्यक्ष विधी सेवा प्राधिकरण मा. सुधाकरजी यार्लगड्डा यांनी आज जिल्हा न्यायालय येथे केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी  कार्यालय , जिल्हा रुग्णालय, अनामप्रेम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांगांसाठी  आधारकार्ड मेळावा जिल्हा न्यायालयात आयोजित करण्यात आला होता.  न्या.मा. सुधाकरजी
यार्लगड्डा हे या मेळाव्याच्या उदघाटन कार्यक्रमात बोलत होते. न्या. यार्लगड्डा पुढे बोलताना म्हणाले की, समाजात अनेक दिव्यांग, गरजू आहेत ज्यांना स्वत:च्या परिवर्तनासाठी व्यवस्थेपर्यंत पोहचण्याची त्यांच्यात शक्ती नाही. अशा गरजू बांधवांना आवश्यक मदत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. 


जिल्हा विधी सेवा प्रधिकरणाच्या वतीने अनामप्रेम संस्थेच्या माध्यामातून आधारकार्ड नसणाऱ्या, दुर्धर अपंगत्व असणाऱ्या दिव्यांगांचा आधार कार्ड नोंदणीचा मेळावा जिल्हा न्यायालयात आयोजित करण्यात आला होता .या मेळाव्याच्या कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा विधी सेवा प्रधिकरणाच्या सचिव न्या. भाग्यश्री पाटील  यांच्या प्रास्ताविकाने झाली. 

यावेळी अनामप्रेम संस्थेतील २०० पेक्षा जास्‍त दिव्यांग उपस्थित होते. या कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, मुख्य न्यायदंडाधिकारी रामकृष्ण चव्हाण,जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. संजय पाटील,ॲड. राजभाऊ शिर्के, ॲड. सुरेश लगड, ॲड. राजेश कावरे, ॲड. कृष्णा झावरे, ॲड. समीर पटेल, ॲड. भूषण बऱ्हाटे, ॲड. ज्ञानेश्वर दाते, ॲंड. पिंटो पाटोळे, ॲड. अंधारे, ॲड. देठे, ॲड. श्याम असावा आदि यावेळी उपस्थित होते. प्रशिक्षणार्थी न्यायाधिश प्रियांका शिंदे, आदित्य शिंदे , स्नेहा देशपांडे, शहनवाज पठाण, रवि काळे, सायली लाभाते, रवि इरले यांच्यासह बहुसंख्य वकील बांधव उपस्थित होते. 

यावेळी अनामप्रेमचे अध्यक्ष इंजि. अजित माने, निवृत सनदी अधिकारी नितीन थाडे, डॉ. मेघना मराठे,अभय रायकवाड, उमेश पंडुरे, विष्णू वारकरी, ॲड.अजित कुलकर्णी,विशाल निंबाळकर, सुवर्णा कोतकर आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आधार केंद्र विभागाचे रवींद्र मुगोलकर, झाकीर शेख यांची यावेळी दिव्यांगांना मोठी मदत झाली. 

या मेळाव्यात २४ गरजू दिव्यांग यांचे आधारकार्ड दूरुस्ती व नवीन आधार कार्ड  बनविण्यात आले. या मेळाव्यात उपस्थित दिव्यांग यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

१० वर्षाने बनले आधारकार्ड
अनामप्रेम निवासी रवि कंठाळे  मागील १० वर्षापासून आधारकार्ड बाबत प्रयत्न करीत होता. सरपटत चालत असल्याने बायोमॅट्रिक नोंदणीत हाताचे ठसे रवि कंठाळे याचे उमटत नव्हते . यामुळे शेकडो वेळा सरपटत चालत माहिती सुविधा केंद्रात जाऊन सुद्धा त्याची निराशा होत  होती. अखेर आज जिल्हा निधी सेवा प्रधिकरणाच्या या आधारकार्ड मेळाव्यात रव‍ि कंठाळे यांची आधारकार्ड नोंदणी झाली. नोंदणी नंतर आधार पावती प्रत न्या.सुधाकरजी यार्लगड्डा यांच्याकडून स्विकारताना रवी या दिव्यांग बंधुच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळले दिसून आले.


*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close