shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अवैध मद्यसाठा व वाहन जप्तीची राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

३ लक्ष ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त

अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
कर्जत तालुक्यातील गुरव पिंप्री रोड, मिरजगाव येथे अवैधपणे विक्री करण्याच्या हेतूने साठवणुक केलेला अवैध मद्याचा साठा तसेच यासाठी वापरण्यात येणारे वाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत जप्त केले असल्याची माहिती अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 गुन्ह्यांत एकूण ३ लक्ष ३३ हजार १३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.अवैध मद्याची साठवणूक करणे व वाहतूक केल्याने संपत नरसय्या बोन्गोनी वय ४७ वर्ष, रा. कृष्णाईनगर, गुरव पिंप्री रोड, मिरजगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर या आरोपीस अटक करण्यात आलेले असून  आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यांत आलेला आहे. या  प्रकरणाचा पुढील तपास  दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क आर. पी. दांगट हे करीत असल्याचेही कळविण्यात आले आहे.


*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close