shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

न्हावी केंद्र शिक्षण परिषद उत्साहात संपन्न.

 
न्हावी केंद्र शिक्षण परिषद उत्साहात संपन्न.

*बदलीने आलेले शिक्षकांचे सत्कार...

पंचायत समिती कडून प्रत्येक केंद्राला देण्यात आलेल्या टॅब चे अनावरण.
इंदापूर प्रतिनिधी:दि 28 न्हावी केंद्रातील इ 1 ली ते 8 वी शिकवणारे सर्व माध्यमाचे शाळांतील शिक्षकांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसदेव येथे शैक्षणिक वर्षातील पहिली शिक्षण परिषद संपन्न झाली. सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पुजन करण्यात आले. *बदलीने आलेले महमंद शेख , प्रमोद कुंभार , धनंजय चव्हाण , विजयकुमार शेंडे , सतेश भोंग , अश्विनी नरखेडकर , साजीद तांबोळी , बापू आदलिंग यांचा गुलाबपुष्प , पेन देवून सत्कार करून स्वागत करण्यात आले.* इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवलेल्या *शिवतेज नवले* याचा सत्कार पालक महेश नवले व सुरेखा नवले यांनी स्विकारला.
           यावेळी *सुलभक राहुल कानगुडे , साजिद तांबोळी , संतोष हेगडे* यांनी पाठ्यपुस्तके वापर , पीजीआई , गुणवत्ता वाढ , निपुण भारत , तंबाखू मुक्त शाळा , व्हिडिओ निर्मिती स्पर्धा , नवभारत साक्षरता अभियान व विद्या संप्रेशन या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. *केंद्र समन्वयक भारत बांडे* यांनी प्रशासकीय कामकाज माहिती दिली.
      यावेळी शशीकला कांबळे , मनिषा काळे , ललिता वाघमोडे , रूपाली बनकर , आलका पवार , विजया पानसरे , सपना आंबेकर , सबिया शेख , प्रतिभा कांबळे ,  संजय दगडे , नितीन रणसिंग , अनिल रासकर , संजय जाधव , सागर रणसिंग , उन्मेश कुचेकर , जाधव सर उपस्थित होते.सुत्रसंचालन स्वागत व आभार संतोष हेगडे यांनी केले.
close