shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आ. दत्तात्रय भरणे यांनी पावसाळी अधिवेशनाप्रसंगी इंदापूर तालुक्यातील शेती महामंडळाच्या कामगारांच्या हक्काच्या घरासाठी व इतर प्रश्नावर मांडली लक्षवेधी.

आ. दत्तात्रय भरणे यांनी पावसाळी अधिवेशनाप्रसंगी इंदापूर तालुक्यातील शेती महामंडळाच्या कामगारांच्या हक्काच्या घरासाठी व इतर प्रश्नावर मांडली लक्षवेधी.

राज्याचे म्हसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी
सकारात्मक निर्णय घेण्याचे  केले  आश्वासित .
इंदापूर प्रतिनिधी: पावसाळी अधिवेशनाच्याप्रसंगी इंदापूर तालुक्याचे आमदार  दत्तात्रय  भरणे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील  शेतीमहामंडळाच्या १४ मळ्यांमध्ये तिन पिढ्यांपासून रहात आलेल्या हजारो कामगारांना हक्काच्या घरासाठी दोन गुंठे जागा मिळावी तसेच खंडकरी शेतकरी बांधवांच्या शेतजमीनीसंर्दभात राहिलेल्या जमीनीचे वाटप व इतर प्रश्न,कळंब ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी जलजीवन मिशन मधून पाणीपुरवठा योजना कळंब ग्रामपंचायतीस मंजूर झाली असल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी शेती महामंडळाकडील रत्नपुरी ता.इंदापूर येथील गट नं.१७८/१(गावकळंब) येथील १० एकर क्षेत्र या पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलाव व पाण्याची टाकी बांधण्यासाठी जागेची मागणी केली असून ती शासनाने तात्काळ मंजूर करावी.त्याचबरोबर कळंब - वालचंदनगर - रणगांव या गावातील मुस्लिम बांधवांच्या दफन भूमीसाठी रत्नपुरी मळामधिल गट नं.३४८/१ मधिल ३ हेक्टर जागा कायमस्वरूपी मिळण्यासाठी लेखी स्वरूपात शासनाकडे प्रस्ताव सादर केला असून शासनाने तो प्रस्ताव तात्काळ मंजूर करून मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीसाठी कायमस्वरूपी जागा द्यावी अशी आग्रही मागणी आमदार  दत्तात्रय  भरणे यांनी सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातून मांडून शासनाचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी राज्याचे म्हसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार  दत्तात्रय भरणे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून वरील मांडलेल्या सर्व प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर आमदार  दत्तात्रय  भरणे यांच्या समवेत संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासित केले.
close