shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजवर्धन पाटील यांच्या हस्ते कौठळी येथे लाभार्थ्यांना आयुष्मान भारत गोल्डन स्मार्ट कार्डचे वाटप*

*राजवर्धन पाटील यांच्या हस्ते कौठळी येथे लाभार्थ्यांना आयुष्मान भारत गोल्डन स्मार्ट कार्डचे वाटप*
   -  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  सामाजिक कार्यकर्ते व युवा सहकारी साहेबराव पिसाळ यांच्याकडून उपक्रमाचे आयोजन
    इंदापूर प्रतिनिधी: आयुष्मान भारत योजने अंतर्गत कौठळी ता. इंदापूर येथे लाभार्थ्यांना स्मार्ट कार्डचे वाटप निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
    आयुष्मान भारत योजना' ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे.या योजनेंतर्गत आयुष्मान भारत गोल्ड कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळतात. इंदापूर तालुक्यातील गरजू व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
 राजवर्धन पाटील म्हणाले की,' सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन भाजप सरकारने अनेक योजना प्रभावीपणे राबविलेल्या असून आयुष्मान भारत गोल्डन  कार्डचे योजना गरजू व्यक्तींना मोठी मदत करीत असल्याचे दिसून येत आहे.नागरिकांनी या योजनेत सहभागी होऊन आरोग्य विषयक सुरक्षितता बाळगावी. यावेळी कौठळी गावचे माजी सरपंच श्री. प्रकाश काळेल म्हणाले की मा. श्री.  हर्षवर्धनजी पाटील साहेब हेच तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेचे अडीअडचणी दूर करू शकतात हर्षवर्धन पाटील साहेब यांचे शिवाय आता कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. 
    युवा सहकारी साहेबराव पिसाळ, भाजपचे पदाधिकारी मोहन दुधाळ, माजी सरपंच प्रकाश काळेल व गावातील सर्व नागरिक यावेळी उपस्थित होते.
close