नगर प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
आज शिर्डी येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शिर्डी येथे कार्यकारणी यांची घोषणा तसेच माननीय ओंकार मगदूम यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रम प्रसंगी योगेश कुमावत (जिल्हा सहकार्यवाह उत्तर नगर ), शिवाजी अमृतराव गोंदकर (माजी नगराध्यक्ष शिर्डी), सत्कारमूर्ती ओंकार मगदूम( विभाग संघटन मंत्री नगर विभाग), निखिल चव्हाण (उत्तर नगर विस्तारक), कुमारी शिवानी ताई नाईक (विद्यार्थिनी विस्तारक उत्तर नगर) तसेच इतर सर्व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते व शिर्डी शहर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यकारिणीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उत्साहाने उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी माननीय सुहास बाबासाहेब भालेराव सर (प्रा. साई निर्माण जूनियर कॉलेज) यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. अध्यक्षीय भाषण योगेश कुमावत तसेच ओंकार मगदूम व प्रमुख पाहुणे शिवाजी अमृतराव गोंदकर (माजी नगराध्यक्ष शिर्डी) यांच्या मनोगताद्वारे नवीन कार्यकारणी यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करण्यास अधिक ऊर्जा मिळाली तसेच विद्यार्थी परिषदेमार्फत पूर्व कार्यकर्ते मयूर चोळके यांचे मनोगत झाले तसेच साई आशा पेस्ट कंट्रोल शिर्डी शुभम हरी राय यांच्यातर्फे सत्कारमूर्ती ओंकार मगदूम व रितेश जनार्दन भालेराव यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
नवीन कार्यकारणी मध्ये निखिल चव्हाण (उत्तर नगर जिल्हा विद्यार्थी विस्तारक), अमोघ कुलकर्णी ( प्रदेश सहमंत्री पश्चिम महाराष्ट्र प्रदेश), कु.शिवानी ताई नाईक (नगर सोलापूर विभाग विद्यार्थिनी), तालुका संयोजक तुषार संजय महाजन, शहर मंत्री रितेश भोसले, शहर सहमंत्री शुभम राय व यश लोखंडे, कार्यालय प्रमुख संतोष चौधरी, कार्यालय सहप्रमुख आरमान सय्यद, कोश प्रमुख युवराज शिंदे, कोश सहप्रमुख मयूर अडांगळे, सोशल मीडिया प्रमुख सिद्धेश भालेराव, एस एफ एस प्रमुख आदित्य डांगे, आर के एम प्रमुख अभिमन्यू पोटे, टी एस वि के प्रमुख ऋतिक बाईक, एस एफ डी प्रमुख साई वाघ, एकलव्य प्रमुख संदीप पवार, आयाम गती विधी प्रमुख श्रीकांत शेलार, आयाम व गतीविधीसहप्रमुख शहबाज शेख, शहर कार्यकारणी सदस्य निखिल चव्हाण, रितेश भालेराव यांची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शिर्डी शहर कार्यकारणी म्हणून घोषणा करण्यात आली त्यांना पुष्पगुच्छ व शॉल देऊन त्यांचे अभिनंदन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा भव्य दिव्य असा सोहळा शिर्डी शहरांमध्ये पार पडला.




