इंदापुरात अनेक गावात राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच बनले जलसंधारणाच्या विकास कामाचे उद्घाटक.
आमदार दत्तात्रय भरणे यांनी कार्यकर्त्यांना उद्घाटन करण्यास लावलेल्या कृतीचे सर्वत्र कार्यकर्त्यांमध्ये होत आहे कौतुक....
इंदापूर प्रतिनिधी: आमदार दत्तात्रय भरणे हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेच्या केंद्रस्थानी कायम असतात. राजकीय व सार्वजनिक जिवनात काम करत असताना त्यांनी सातत्याने आपल्या साधेपणाचा आणि अनोख्या कार्यशैलीची झलक समाजाला अशा पद्धतीने दाखवून दिला आहे.
आज आमदार भरणे यांचा असाच एक अनोखा अंदाज तालुकावासियांना पहायला मिळाला.
आ.भरणे यांनी नुकतीच जलसंधारणाच्या विभागाच्या सुमारे ५० कोटीच्या विकासकामांवरील स्थगिती उठविण्यामध्ये यश मिळवले असून या कामांचा भूमिपूजन समारंभ आज सकाळी १०:०० वाजता करण्याचे योजिले होते.
या विषयी गावोगावच्या कार्यकर्त्यांना सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्याच्या सूचना आमदार भरणे यांच्याकडून दोन-चार दिवसांपूर्वी मिळाल्या होत्या.त्यामुळे कार्यकर्त्यांनीही उद्घाटन फलक तसेच ठिकठिकाणी आमदार भरणे यांचे स्वागताचे फ्लेक्स लावून जय्यत तयारी केली होती.तालुक्यातील अनेक गावांमध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ होणार होता.परंतु सर्वत्र सकाळी दहा ची वेळ दिल्याने कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले होते.त्यामुळे आपल्या गावात आ.भरणे नेमके कधी येणार!याविषयी गावकरी अनभिज्ञ होते.आपल्या गावामध्ये उद्घाटनाच्या निमित्ताने आमदार भरणे मामा नेमके कधी येणार याची उत्सुकता गावकऱ्यांना लागली होती. तर दुसरीकडे भरणेवाडीला आमदार दत्तात्रय भरणे यांचा नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजल्यापासून जनता दरबार चालू होता.आपल्या अडीअडचणी घेऊन हजारो नागरिक आमदार भरणे यांच्या निवासस्थानी आले होते.त्यामुळे ते जमलेल्या लोकांच्या अडचणी सोडविण्यामध्ये मग्न होते.एवढ्यात जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ यांनी दहा वाजायला थोडाच अवधी राहिला असून गावगावचे कार्यकर्ते फोन करून मामा कधी येणार आहेत म्हणून विचारत असल्याचे आमदार भरणे यांना सांगितले.यावर ते क्षणभर शांत बसले आणि अचानक आपला स्वीय सहाय्यक अनिकेत जाधव यांना क्षणार्धात गावोगावच्या कार्यकर्त्यांना निरोप द्यायला लावत, माझ्या येण्याची वाट न बघता आपापल्या गावातील उद्घाटने उरकून घेण्याचा सांगावा त्यांनी धाडला.आणि लागलीच एका क्षणात सामान्य कार्यकर्तेच उद्घाटक बनले व आपापल्या गावांमध्ये भूमिपूजन समारंभ करू लागले.त्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे यांनी अनपेक्षितपणे दिलेल्या सुखद धक्क्यामुळे कार्यकर्त्यांच्या आनंदाला मात्र उदान आले .
आमदार दत्तात्रय भरणे यांनी स्वतः उपस्थित राहत काळेवाडी,पळसदेव,भावडी आणि न्हावी या ठिकाणी भूमिपूजन केले तर जेष्ठ नेते प्रतापराव पाटील,प्रशांत पाटील,श्रीमंत ढोले,हनुमंत कोकाटे,शिंदे सर,सचिन सपकळ,,दिपक जाधव,हनुमंत बंडगर,शहाजी पाटील,नवनाथ रूपनवर, सुभाष पाटील,सचिन देवकर,दादा सूळ, किरण बोरा,संदीप माने,संजय देवकर,सचिन काळे,शुभम निंबाळकर,विजय घोगरे,कैलास शिंदे,सतीश पांढरे, अतुल झगडे,हामा पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी उर्वरित ठिकाणचे कार्यक्रमाचे नियोजन केले.

