रोट्रॅक्ट क्लब ऑफ इन्द्रेश्वरला सर्वोतोपरी मदत करणार - ॲड. सिद्धेश गायकवाड
इंडपूर क्लबला प्रांत प्रतिनिधी यांची भेट : रोट्रॅक्ट क्लब ऑफ इन्द्रेश्वरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
इंदापूर : रोटरी इंटरनॅशनलच्या, रोटरी क्लबच्या अंतर्गत ग्रामीण भागात युवकांचे रोट्रॅक्ट क्लब उत्तम सामजिक काम करत आहेत. त्यामुळे युवकांच्या व्यक्तिमत्व विकासात प्रचंड बदल होत आहेत. रोट्रॅक्ट क्लब ऑफ इन्द्रेश्वर मागील तीन वर्षे उत्तम सामजिक काम करत असल्याने, इन्द्रेश्वर क्लबला सर्वोतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही, पुणे प्रांत प्रतिनिधी ॲड. सिद्धेश गायकवाड यांनी दिली.
इंदापूर पंचायत समितीच्या लोकनेते शंकरराव पाटील सभागृहात, रविवार ( दि. २३ जुलै ) रोजी, रोट्रॅक्ट क्लब ऑफ इन्द्रेश्वरच्या संचालक मंडळाचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे अध्यक्ष आझाद पटेल, पुणे प्रांत प्रतिनिधी ऍड. सिद्धेश गायकवाड, रोटरीचे माजी अध्यक्ष नरेंद्र गांधी, युथ डायरेक्टर मोरेश्वर कोकरे, रोट्रॅक्ट विभागीय अधिकारी यशवर्धन कांचन, सौरव थोरात यांच्या प्रमुख उपस्थिती, अध्यक्षपदी आकाश खरात, सचिवपदी मच्छिंद्र किरकत, खजिनदारपदी सागर शिंदे व संचालक मंडळाची निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे अध्यक्ष आझाद पटेल म्हणाले की, रोटरीमध्ये काम करीत असताना, रोट्रक्ट क्लबच्या युवकांची मोलाची साथ मिळते. अनेक सामजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही युवकांना येणाऱ्या काळात प्रोत्साहन देणार असून, सर्वांना सोबत घेवून काम करणार आहे.
यावेळी रोटरी क्लबचे संचालक धरमचंद लोढा, प्रमोद भंडारी, प्रशांत शिताप, सुनील मोहिते, समीर सूर्यवंशी, विजय खरात आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर वलेकर यांनी केले तर आभार अमोल राऊत यांनी मानले.
चौकट : संचालक मंडळात यांची झाली निवड
निवड झालेले पदाधिकारी व्यवसायिक विकास अधिकारीपदी अमोल राऊत, सार्जंट ऑफ आर्म्स पदी मोहिनी शिंदे, वूमन रिस्पेक्टीव्ह डायरेक्टर पदी दुर्गा खरात, क्लब ईडीटरपदी विश्वास गाढवे, क्लब सर्व्हिस डायरेक्टपदी नागेश तनपुरे, आंतरराष्ट्रीय सर्व्हिस डायरेक्टरपदी अजय सपकळ यांची निवड करण्यात आली तर संचालकपदी केदार गोसावी, वैभव हवलदार,
स्वप्निल साळुंखे, प्रतीक कवितके, सागर तनपुरे, नितीन तनपुरे, अक्षय तनपुरे, गणेश सपकळ, अमोल आवटे, अजय सपकळ, महेश माने, गणेश सपकळ, समाधान गायकवाड, रोहित मदने, सुरज राऊत, सहदेव भराटे, अभिजीत साळुंखे, संग्राम यादव, भारत माने, प्रीती खरात, रोहन राऊत यांची निवड सन २०२३-२४ या वर्षासाठी करण्यात आली आहे.
फोटो ओळ : रोट्रॅक्ट क्लब ऑफ इन्द्रेश्वरच्या सन २०२३-२४ वर्षासाठी कार्यकारिणी निवड करण्यात आलेले संचालक मंडळ

