प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ५ / करमाळा शहरातील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजींना गुरुपौर्णिमेनिमित्त सदिच्छा भेट दिली व सत्कार सन्मान केला.
आदरणीय वंदनीय श्री . हंबीरराव मुरूमकर (गुरुजी) हे १९८२ ते १९८६ या कालावधीमध्ये या विद्यार्थ्यांना पहिली ते चौथी शिकवायला होते . श्री . मुरूमकर गुरुजी हे मूळचे करमाळा तालुक्यातील बिटरगाव चे आहेत .
मुरूमकर गुरुजींनी सर्व विद्यार्थ्यांना नेहमी चांगले शिक्षण व संस्कार दिले. विद्यार्थी नेहमीच गुरुजींचा आदर करायचे.
यावेळी डॉ. शैलेश देवकर, बंडू उपाध्ये, राजेश रासकर, पत्रकार सूर्यकांत होनप , गणेश बोरा उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी गुरुजींचे चरण पाण्याने धुऊन हळद कुंकू लावून पुष्प वाहून पूजा केली व फेटा व हार घालून सत्कार केला. सर्व विद्यार्थ्यांनी गुरुजींचे आशीर्वाद घेतले. हे सर्व पाहून गुरुजींचे मन भरून आले त्यांचे डोळे आनंदाश्रुंनी डबडबले. मुरूमकर गुरुजी सर्व विद्यार्थ्यांना गळा भेट देऊन सर्वांनी आयुष्यात खूप मोठे व्हा व खूप प्रगती करा तुम्ही सर्वजण आयुष्यात उत्तुंग भरारी घ्या असे भरभरून आशीर्वाद दिले.

