*कदम विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप*
इंदापूर प्रतिनिधी:रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांना जेनिथ टेक्नोफास्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रांजणगावचे डायरेक्टर नितीन पोपटराव जाधव यांचेकडून वह्या वाटप करण्यात आले. त्यांच्या मातोश्री व विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका छाया जाधव यांच्या हस्ते व विद्यालयाचे प्राचार्य भास्कर वाबळे पर्यवेक्षिका पुष्पा काळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी छाया जाधव यांनी विद्यालयातील आठवणींना उजाळा दिला. गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून कर्मवीर अण्णांनी सुरू केलेल्या शाळेत आजही गोरगरिबांची मुले शिक्षण घेत आहेत. अशा मुलांना शैक्षणिक मदत व्हावी या उद्देशाने वह्या वाटप करण्यात आले.तसेच यापुढेही गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करू असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मोहिते यांनी केले तर आभार प्रिया भोंग यांनी मानले.

