नोकरी पेक्षा व्यवसाय चांगला - रविभाऊ लांडगे.
इंदापूर प्रतिनिधी:
सकाळची सुरुवात कडक आणि सुगंधी चहा पिउन केला जातो. असाच दर्जेदार आणि शरीरातील थकवा दूर करणारा मल्हार अमृततुल्य चहा भोसरी येथील इंद्रायणी नगर शेजारी लोकांच्या सेवेसाठी नोकरी पेक्षा व्यवसाय चांगला या उद्देशाने सुरेश कस्पटे व डॉक्टर रमाकांत कस्पटे यांनी सुरू केला हे अभिमानास्पद आहे. असा गौरवोद्गार प्रसिद्ध मल्हार अमृततुल्य चहाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे बिनविरोध नगरसेवक रवीभाऊ लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्यांनी व्यक्त केला.
यावेळी युवा उद्योजक ,मयुरशेठ लांडे पाटील , डॉ चंद्रकांत पाटील, श्री सुरेश शेठ कसपटे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल पुणे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव शिंदे, खेड तालुका अध्यक्ष रयत जनरल कामगार संघटना स्वप्नील मेदनकर आणि परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

