shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुरुपौर्णिमा दिवसी गुरुजनांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य - विलासराव गाढवे.

गुरुपौर्णिमा दिवसी गुरुजनांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य  - विलासराव गाढवे.

ज्येष्ठ संपादक विलासराव गाढवे यांनी महात्मा फुले विद्यालय बिजवडी  येथील गुरुजनांचा केला सन्मान.
इंदापूर प्रतिनिधी: गुरुपौर्णिमा दिवसी गुरुजनांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे असे मत  ज्येष्ठ संपादक विलासराव गाढवे यांनी महात्मा फुले विद्यालय बिजवडी येथील गुरुजनांचा सन्मान करताना (दि. ३ ) व्यक्त केले.

 सोमवारी दि. ३ जुलै २०२३  हा  आषाढ महिन्यातील पौर्णिमेचा दिवस ही  गुरुपौर्णिमा म्हणून सर्वत्र साजरी केली गेली. या दिवसी सर्वत्र गुरुबद्दल आदरभाव व्यक्त केला गेला. असाच आदरभाव पत्रकार क्षेत्रातील ज्येष्ठ व साप्ताहिक लक्ष्मी वैभव चे संपादक विलासराव गाढवे व साप्ताहिक शिवसृष्टीचे संपादक धनंजय कळमकर यांनी आपल्या साप्ताहिकाच्या वतीने बिजवडी येथील विद्यालयातील सर्व गुरुजनांना ज्ञानदानाचे काम योग्य प्रकारे करीत असल्याबद्दल
 गुरु पोर्णिमा निमित्त शुभेच्छा देत फुल ना  फुलाची पाकळी म्हणून भिंतीवरील घड्याळ व दिनदर्शिका भेट  दिली.

यावेळी मुख्याध्यापक विकास फलफले , सहशिक्षक सुनिल माळी, शंकर हुबाले, चंद्रकांत काळे, कालिदास मोरे ,  गोरू मेंगाळ , जयश्री झगडे,वर्षा कचरे,शितल जाधव, स्वाती पडळकर, रविंद्र माने व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी संपादक विलासराव गावडे म्हणाले की, पौराणिक मान्यतेनुसार गुरुपौर्णिमा ही महाभारताचे लेखक वेद व्यास यांचा जन्मदिवस मानला जातो त्यांच्या सन्मानार्थ या दिवसाला व्यासपोर्णिमा असेही म्हणतात गुरु पौर्णिमेच्या दिवसी महर्षी वेद व्यास यांनी चारही वेदांची रचना केली आणि म्हणूनच त्यांना वेदव्यास असे नाव पडले . अशा या दिवसी गुरुजनांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे त्यांनी आपले मत व्यक्त केले.
close