लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा - चुंबळकर
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २५/ करमाळा तालुक्यातील बिटरगाव ते तरटगाव बंधाऱ्याकडे जाणारा रस्ताही अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. कुठलेही वाहन या रस्त्याने पावसाळ्यामध्ये जाऊ शकत नाही पायी सुद्धा चालण्याच्या लायकीचा हा रस्ता राहिलेला नाही. या रस्त्याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी अर्बन बँकेचे माजी संचालक चंदक्रांत चुंबळकर यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा रस्ता महत्वाचा असून अनेक विद्यार्थी, शेतकरी, या भागातील रहिवासी चिखल तुडवत या रस्त्याने ये- जा करत असतात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या सर्वांना या रस्त्याचा खूप त्रास सहन करावा लागतो तरी प्रशासनाने या होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून घ्यावा.
बिटरगाव येथून भोसले व दळवी यांच्या बांधावरून कॅनलवरून हा रस्ता सीना नदीवरील तरटगाव बंधाऱ्याकडे जातो व पुढे तसाच तरटगावला निघतो. या रस्त्याने बोराडे, मुरूमकर, नलवडे, पाटील, शिर्के आदींची वस्ती आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी महत्वाचा आहे. या रस्त्यावर सध्या पावसाने चिखल झाला आहे. शेतकऱ्यांचा ऊस काढण्यासाठीही येथे मोठी अडचण निर्माण होते.
शाळकरी विद्यार्थ्यांना ही खूप त्रास सहन करावा लागतो विद्यार्थ्यांना शाळेत येता जाता चिखलातून जावे लागते कपडे खराब होतात तर कधी शाळेतच जाता येत नाही. त्यामुळे या रस्त्याकडे प्रशासनाने काळजीपूर्वक व त्वरित लक्ष देण्याची गरज आहे असे मत अर्बन बँकेचे माजी संचालक चंद्रकांत चुंबळकर यांनी व्यक्त केले आहे व प्रशासनाने लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा अशी विनंती केली आहे.

