shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोयोला सदन येथे संत इग्नाती स्मारकाचा अनावरण सोहळा संपन्न


श्रीरामपूर प्रतिनिधी:
शहरातील लोयोला सदन चर्च येथे संत इग्नाती सणाच्या पूर्वसंध्येला नाशिक धर्मप्रांताचे बिशप लूर्डस डॅनियल यांच्या आशीर्वादाने व प्रमुख धर्मगुरू फादर ज्यो. गायकवाड यांच्या संकल्पनेतून  साकारलेल्या येशू संघाचे संस्थापक व धर्मग्रामाचे आश्रयदाता संत इग्नाती लोयोलाकर यांच्या भव्य दिव्य स्मारकाचे अनावरण पुणे येशू संघाचे प्रांताधिकारी फादर अग्नेलो मस्कारेन्हास यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी प्रमुख धर्मगुरू फादर ज्यो. गायकवाड, पुणे ज्ञानपीठाचे धर्मगुरू फादर क्लॉडियस, फादर अनिल चक्रनारायण, सेंट झेवियर्स स्कूलचे प्राचार्य फादर टायटस थंगराज, सहाय्यक धर्मगुरू फादर संपत भोसले, सेंट अँन सिस्टर्स, कनोशियन सिस्टर्स यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अनावरण सोहळा संपन्न झाला. नोव्हेनाचा हा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने धर्मग्रामातील भाविक उपस्थित होते. उत्तम कलाकृतीचा नमुना असलेले हे स्मारक बांधकाम अभियंता सुरेश कांबळे यांनी साकारले आहे.

दरम्यान मान्यवरांच्या हस्ते लोयोला संदेश त्रैमासिकाचा प्रकाशन सोहळा ही पार पडला.भाविकांना प्रीती भोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी कमलाकर पंडित, विजय त्रिभुवन, ललित गायकवाड, प्रवीण सात्राळकर, रवि त्रिभुवन, राकेश दुशिंग, लाजारस गायकवाड, डॅनियल साळवे, उत्तम गायकवाड, जॉन धिवर संदीप साळवे, लता बनसोडे, शोभा त्रिभुवन, सुवर्णा बोधक, बेनिंग्ना पवार, निर्मला अमोलिक, पुष्पा साठे, सविता वाघमारे, विजया दळवी,संगीता पंडित, फा. हान्स स्टाफनर प्रतिष्ठान सदस्य,
युवक मंडळ ,गायन मंडळ व महिला मंडळ सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close